Posts

पुस्तक परिचय : One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)

Image
शंभर-एक वर्षांपूर्वीच्या तामिळनाडूतल्या एका खेड्यातल्या जोडप्याची (पोन्ना आणि काली) ही कथा आहे. लग्नाला १०-१२ वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नाही म्हणून गावातल्या लोकांकडून, नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत असतात. दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. पोन्ना मूल व्हावं म्हणून बर्‍यापैकी डेस्परेट असते; कालीचं म्हणणं असतं आपण दोघं एकमेकांच्या साथीला असणं जास्त महत्वाचं. त्या काळात त्यांच्या गावात, पंचक्रोशीत ज्या प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा असतात त्यानुसार दोघं नाना उपाय करतात. या पूजाअर्चा, नवस, विविध देवाची सेवा यांची पुस्तकात खूप सविस्तर वर्णनं येतात. माझ्यासारख्या व्यक्तीला एका टप्प्यानंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. तरी दोघांचं त्यामागचं डेस्परेशन या त्यातल्या एका धाग्याने मला बांधून घातलं. त्या वर्णनातली पोन्ना आणि कालीची इंटरअ‍ॅक्शन काही काही ठिकाणी खूप बारकाव्यांसहित आणि नकळत वाचकांसमोर येते. त्यांच्यातलं नातं त्यातून छान समजतं. या पूजा, उपासतपास, नवस कशाचाच उपयोग होत नाही. शेवटी दोघांच्या आया एक मार्ग सुचवतात. त्या भागातल्या मंदिरात दरवर्षी एका उत्सवाच...

पुस्तक परिचय : The Passengers (John Marrs)

Image
भविष्यकाळात घडणारी कादंबरी आहे. ब्रिटनमध्ये स्मार्ट, ड्रायव्हरलेस कार्सचा वापर वाढलेला असतो. तो आणखी वाढावा असा सरकारचा प्रयत्न असतो. लेव्हल-१ ते लेव्हल-५ अशा या कार्स असतात. त्यात लेव्हल-५ कार्सना मॅन्युअल कंट्रोलचा पर्यायच नसतो. याच कार्स पुढच्या दहा वर्षांत ब्रिटनमध्ये सगळीकडे आणायच्या, माणसांना चालवता येतील अशा कार्स बाद करायच्या, असा सरकारचा प्लॅन असतो. त्या दृष्टीने स्मार्ट कार्सचं decision making, A.I. कसं असावं यावर चर्चा, संशोधन म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांना आमंत्रण देऊन आळीपाळीने काही panels तयार होत असतात. त्यात सरकारतर्फे एक प्रतिनिधी असतो. देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या स्मार्ट कार्स अपघातांचा अभ्यास करून A.I. मध्ये कोणकोणते बदल करायला हवेत त्यावर चर्चा होत असतात. कादंबरीची नायिका अशाच एका चर्चागटात बोलावली जाते. तिचा लेव्हल-५ स्मार्ट कार्सना विरोध असतो. (आणि अशा चर्चांनाही ती फारशी अनुकूल नसते. त्याची कारणं कथेत येतात.) या चर्चागटाचं काम सुरू होतं आणि दुसर्‍याच दिवशी ८ स्मार्ट कार्स हॅक होतात. त्या गाड्यांना एकसमान destination ठरवून दिलं जातं. पुढच्या दो...

अफगाण निर्वासित - फुफाट्यातून कुठे?

Image
अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरालगत गेल्या काही वर्षांत एक नवी वस्ती उभी राहिली आहे. वस्ती कसली , एक लहानसं खेडंच म्हणायला हवं. खेड्यात एका जेमतेम गिलावा केलेल्या छोट्या घरात ६० वर्षीय हलिमा बीबी आपल्या तीन तरूण मुलांसह राहते. त्यांतल्या एकालाही नोकरी नाही. हलिमा बीबीची प्रकृती वयोमानापरत्वे खालीवर होत असते. पण गावात कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. गावात अशी आणखी पाचशे-सहाशे कुटुंबं सहज असतील. त्यांची संख्या सतत वाढते आहे. गावाच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. चिंतेने ग्रासलेली हलिमा बीबी म्हणते , ‘ इथे अवघड परिस्थिती आहे. आमचे नातेवाइक , मित्रमंडळी सगळे तिकडेच आहेत. इथे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे.’ हलिमा बीबी सांगते ते ‘तिकडे’ म्हणजे पाकिस्तानात. या गावातले सर्वजण पाकिस्तानात तीन-चार दशकं निर्वासित म्हणून घालवून आता अफगाणिस्तानात परतले आहेत. तेव्हा स्वतःचं घरदार सोडून पळताना त्यांच्यासमोर भविष्यातला अंधार होता आणि आता परतल्यावर देखील भविष्यात काय वाढून ठेवलंय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही... अफगाणिस्तानातलं नागरी जीवन सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासून ढवळून निघायला सुरुवात ...

पुस्तक परिचय : Reshaping Art (T. M. Krishna)

Image
कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत.  उदा. कर्नाटकी संगीत कार्यक्रम म्हणजे निव्वळ श्रवणभक्ती उरत नाही, तिथे ब्राह्मणी संस्कृतीचं पुरेपूर प्रतिनिधित्व दिसतं. (ते स्वतः कर्नाटक संगीत शिकत असतानाच्या काही गोष्टी, निरिक्षणं त्यांनी पुस्तकात थोडक्यात सांगितली आहेत.) रसिकांना, श्रोत्यांना, डोळ्यांसमोर ठेवून कलानिर्मिती करण्यातच कलाकारांना जास्त रस असतो. कलारसिकांकडे सहप्रवासी म्हणून नव्हे, तर एक ग्राहक (कन्झुमर) म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, कलाकार आनंदाचे पुरवठादार बनून राहतात. कला जेव्हा धार्मिक अनुष्ठान बनून र...

निर्वासितांच्या कला, निर्वासितांसाठी कला

Image
  "and yet I found in this dome a lot of love, kindness, spirit, life, moments - and pure art... I felt: yes, I am a citizen of the world and I have a safe place." -- माजिद आदिन, इलस्ट्रेटर, इराण ----- सुप्रसिद्ध इंग्लिश पॉप-रॉक गायक सर एल्टन जॉन यांचं सत्तरच्या दशकातलं एक गाणं आहे- ‘रॉकेट मॅन’. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून दोन-तीन वर्षंच झाली होती... अवकाशमोहिमांचं अद्भुत जगासमोर आलं होतं... अशात या गाण्याचे गीतकार बर्नी टॉपिन यांनी एका अंतराळवीराची व्यथाच या गाण्यात उलगडून दाखवली. अंतराळ मोहिमा म्हणजे फार काळ आश्चर्याची बाब राहणार नाही, बघताबघता माणसांसाठी ती नित्यनेमाची गोष्ट होईल, असं म्हणत त्यांनी तंत्रज्ञान आणि मानवी मन यांच्यातलं द्वंद्व गाण्यात मांडलं. पाश्चात्य जगतात हे गाणं खूप गाजलं. सर एल्टन आणि टॉपिन यांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं. या संगीतमैत्रीला ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २०१७ साली एक स्पर्धा घेण्यात आली. या जोडीची सत्तरच्या दशकातली तीन गाणी निवडून तीन वेगवेगळ्या प्रकारांतर्गत त्याचे म्युझिक व्हिडिओज तयार करून पाठवण्याचं आवाहन केलं गेलं. त्यात ‘र...

पुस्तक परिचय : Snowblind (Ragnar Jónasson)

Image
आइसलँडच्या पार उत्तरेकडचं एक दुर्गम गाव. कादंबरीचा नायक पोलीस ऑफिसर आहे. त्याला पहिलंच पोस्टिंग या गावात मिळतं. गावातलं पोलीस स्टेशन अगदी लहानसं, स्टाफ अगदी मर्यादित. एकूण फक्त ३ जण. कारण तिथल्या हेडच्या म्हणण्यानुसार nothing happens here. गावात एक हौशी नाटक कंपनी असते. ती मंडळी दरवर्षी एक नाटक लिहून बसवून गावात सादर करत असतात. नाटकातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक हीच कथानकातली मुख्य पात्रं आहेत. गावात २ मृत्यू होतात. एक अपघाती, एका परीने आसपास माणसं असताना. दुसरी आत्महत्या, संशयास्पद वातावरणात. पोलीस प्रमुख दोन्ही मृत्यू त्या-त्या रकान्यात टाकतो. पण नायकाला काही बारीकसारीक गोष्टी खटकत असतात. तो आडूनआडून तपास सुरू करतो. वर्षातला बराच काळ त्या भागात बर्फ आणि प्रचंड थंडी असते. अगदी कुंद वातावरण असतं. देशातल्या दक्षिण भागात वाढलेला नायक, त्याला हे वातावरण घुसमटून टाकत असतं. ही नोकरी स्वीकारली ती चूक झाली का हा विचार त्याला छळत असतो. त्याची मनाची अस्वस्थता कथानकात चांगली गुंफली आहे. प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे गावात येणारा एकमेव रस्ता बंद झालेला असतो. विमानसेवाही बंद असते. या...

पुस्तक परिचय : Let Me Say It Now (Rakesh Maria)

Image
मुंबईचे सुपर-कॉप राकेश मारिया यांनी आपल्या ३०+ वर्षांच्या पोलीस सेवेतले अनुभव, आठवणी लिहिल्या आहेत. सुरुवातीचं अकोला पोस्टिंग आणि नंतर एकदा रायगड जिल्ह्यातलं अल्प काळाचं पोस्टिंग वगळता त्यांनी कायम मुंबईत काम केलं. आणि त्यातही क्राइम डिटेक्शन हे त्यांचं आवडतं फील्ड होतं. १९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोट तपासामुळे ते प्रकाशात आले. तेव्हाचं सगळं वर्णन, तपासाची माहिती, संजय दत्तला त्यांनी अटक केलं त्या आठवणी वाचायला इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा मी या बातम्या बर्‍यापैकी फॉलो करायचे. ते सगळं पुन्हा आठवलं. नंतरही मुंबईतले काही स्थानिक गुन्हे, गाजलेल्या केसेस, काही गुन्हेगारांचा इतर राज्यांमध्ये काढलेला थरारक माग, नेपाळ बॉर्डरपर्यंतच्या मोहिमा मुंबईत बसून मॉनिटर करणे, हे सगळं पण भारी आहे. त्यातलं पोलिसी जार्गन (उदा. क्लीन पिक-अप) वगैरेमुळे थ्रिलर सिनेमे पाहत असल्यासारखं वाटतं. प्रत्येक मोहिमेतले त्यांचे ज्युनिअर सहकारी, कुणाची काय खासीयत होती, क्राइम डिटेक्शनसाठी खबर्‍यांचं जाळं कसं महत्वाचं असतं, हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलं आहे. (खबर्‍यांचं विस्तृत आणि बारकाईने रचलेलं जाळं यासाठी ...