Posts

Showing posts from May, 2011

गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.

Image
आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असण

एका वाक्यातलं आर्ट ऑफ लिव्हिंग

शाळेत असताना ‘सुविचार’ हा एक छळवाद मागे लागलेला असायचा. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच्या सूचनाफलकावर आणि नंतर वर्गातल्या फळ्यावर रोज एक नवा सुविचार लिहिण्याचं काम आळीपाळीने करावं लागायचं. सहावी-सातवीत असेपर्यंत त्या सुविचारांचा पुरवठा न चुकता मराठीच्या बाईंकडून व्हायचा. आठवीपासून ती ही अतिरिक्त जबाबदारी अंगावर येऊन पडली. बर्‍याच वेळेला असंही व्हायचं की जी वाक्यं आम्ही ‘सुविचार!’ म्हणून निवडायचो ती बाईंच्या मते अगदीच साधी ठरायची. पुन्हा, ‘अति तिथे माती’सारखी घासून गुळगुळीत झालेली वाक्यं लिहायची म्हणजे शान के खिलाफ! त्यातूनच कधीतरी सुविचाराच्या जागी एखादं संस्कृत सुभाषितही चालतं हे कळलं. कळल्यावर बर्‍यापैकी हायसं वाटल्याचं मला अजूनही आठवतंय. मग, वर्गात सर्वांसमक्ष ज्यांचा अर्थ सांगणं त्यातल्या त्यात सोपं जाईल अशी सुभाषितं संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातून शोधून आम्ही फळ्यावर लिहायचो. सुविचारांचा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीनं मराठी (आणि काही अंशी संस्कृत) त्यातल्या त्यात बरं पडायचं. इंग्रजीची मात्र त्या आघाडीवर जरा कठीणच अवस्था होती. काहीकाही इंग्रजी सुविचार तर एखाद्या अत्यंत अवघड कोड्याप्रमाणे