Posts

Showing posts from 2018

न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच!
न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा

----------

‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...

ते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, हॉटेलपर्यंत टॅक…

पुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

Image
कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.

पुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.

‘…

मोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार

Image
मध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.
Munich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.
आईकमन प्रकरणाप्रमाणेच …

न्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा!

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!
न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! ---------- भूगर्भीय हालचाली म्हटलं की एकतर वज्रेश्वरी-गणेशपुरीची गरम पाण्याची कुंडं आठवतात; किंवा मग थेट कुठलातरी (प्रत्यक्ष न पाहिलेला) जागृत ज्वालामुखी. मध्यंतरी इंडोनेशियातल्या एका जागृत ज्वालामुखीच्या पर्यटनावरचा एक लेख वाचनात आला होता. तो वाचून ते ठिकाण तेव्हाच माझ्या विशलिस्टमध्ये आलेलं होतं. गरम पाण्याची कुंडं लहानपणी पाहिलेलीच होती. त्यामुळे एकदा इंडोनिशियाला एक फेरी केली, म्हणजे चारधामच्या चालीवर भूगर्भीय हालचालींचं द्विधाम पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही असं मनोमन ठरवून टाकलेलं होतं. पण मग न्यूझीलंडच्या रोटोरुआनं खांद्यावर टॅप करून ‘शुक...शुक’ केलं, आणि सांगितलं, ‘हमारे जैसे भी खडे हैं राहों में...’ रोटोरुआच्या एअरपोर्टवर विमानातून बाहेर पाऊल टाकलं आणि एक वेगळाच वास नाकात शिरला. म्हटलं तर त्याची नोंद घेतली गेली; म्हटलं तर नाही. १०-१५ वर्षं गुजराथच्या अत्यंत प्रदूषित औद्योगिक पट्ट्यात राहिल्यानं अशा वेगळ्या वासाची नाकाला इतकी सवय झाली आहे, की तो वास आल्यावर आधी गुजराथचीच आठवण आली. गुजराथइतका तो व…

न्यूझीलंड-२ : Unique to New Zealand... हे फक्त इथेच

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.
नेटवर …