Posts

Showing posts from March, 2012

...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मायबोली डॉट कॉमतर्फे महिला दिनानिमित्त लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख परिसंवाद विशेषांक प्रकाशित करण्यात आला. त्या विशेषांकातला हा माझा लेख. मूळ लेख इथे वाचता येईल.

-------------------------


मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे. परीक्षेचा अभ्यास असो, सुट्टीतले कार्यक्रम असोत, इतर काही मौजमजा अथवा अडीअडचणी असोत किंवा एखाद्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो, त्यांच्या एकमेकांशी सल्लामसलत-गप्पा-गुजगोष्टी या ठरलेल्या असायच्या. बरं, ती त्याला सोडून आमच्यात मिसळायची नाही म्हणावं, तर तेही नाही. ग्रूपच्या धमाल मस्तीत कायम हजर असायची, कॉलेजच्या सगळ्या उपक्रमांमध्येही पुढे असायची. हे कॉलेज सोडून त्या मुलाच्या कॉल…