Posts

Showing posts from April, 2009

कीर्तनाचे रंगी... ??

एका रविवारची दुपार... टी.व्ही. वर देव आनंदचा ‘तेरे घर के सामने’ पाहत बसले होते. पुढ्यात टी-पॉयवर टी. व्ही., डीश टी. व्ही., म्युझिक सिस्टीम आणि होम-थिएटरचा प्रत्येकी एक रीमोट, एक ए. सी. चा रीमोट आणि दोन सेल फोन असा सगळा संसार मांडलेला होता. इतक्यात दोनपैकी एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला. बघितलं तर बहिणीचा फोन होता. रविवारची दुपार आणि सख्ख्या बहिणीचा फोन म्हणजे किमान अर्धा तास तरी गप्पा ह्या ठरलेल्या! तोपर्यंत टी. व्ही. म्यूट केलेला बरा असा विचार करून पुढे झाले तर त्या ढीगभर रीमोटस मधून नक्की कुठला पटकन उचलायचा तेच क्षणभर कळेना. स्वतःवरच वैतागत एकदाचं त्या देव आनंदला गप्प केलं आणि फोन उचलला....
आजकाल हे असंच होतं... सी। डी. लावून गाणी ऐकत असताना ए. सी. कमी किंवा जास्त करावासा वाटतो, एखादं छान ठेक्याचं गाणं लागलं की म्युझिक सिस्टीमचा ‘बास बूस्टर’ चालू करावासा वाटतो... आता या सगळ्या गोष्टी बसल्या जागेवरूनच करता येत असतील तर जागचं उठतंय कोण आणि कश्याला! ते करत असतानाच सेलफोन वाजतो आणि मग पुढ्यातलं नक्की कुठलं चपटं यंत्र उचलून त्यावरची बटणं दाबायची ते त्याक्षणी ध्यानातच येत…