Posts

Showing posts from May, 2018

न्यूझीलंड-२ : Unique to New Zealand... हे फक्त इथेच

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.
नेटवर …