Posts

Showing posts from 2019

तूऽऽ मेनी पीपल्स!!

मित्रमंडळींच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर एकाने ताजमहालाचे स्वतः काढलेले काही अप्रतिम फोटो पोस्ट केले. आम्ही सारे फोटोंचं कौतुक करत असताना तो म्हणाला, ‘साडेचार तास रांगेत उभे होतो, खूप गर्दी होती’... ते वाचून माझ्या पोटात गोळाच आला...
गर्दी पर्यटनाचे आमचे एक-एक अनुभव डोळ्यांपुढे यायला लागले...

६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अमृतसरमध्ये होतो. सकाळी लवकर उठून सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग दोन्ही ठिकाणांवर टिक-मार्क करून, दुपारी जरा आराम करून मग वाघा बॉर्डरला जायचं असा विचार होता. पण आम्ही ठरवलेल्या जीपचा ड्रायवर म्हणाला, दुपारी लवकर निघू, नंतर खूप गर्दी होते. गर्दी होते म्हटल्यावर काय, आमचं बोलणंच खुंटलं. जेवल्या-जेवल्या निमूट निघालो.

दुपारी दोन-अडीच वाजता वाघा बॉर्डरनजिकच्या वाहनतळापाशी आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे जवळपास शुकशुकाट होता. आम्ही आलो तोच हमरस्ता पुढे जात होता; मात्र तो एका मोठ्या फाटकाने बंद केलेला होता; तिथून पुढे वाहनं न्यायला परवानगी नव्हती. रस्त्याच्या एका कडेला मालवाहू ट्रक्स रांग लावून उभे असलेले दिसत होते. वाटलं, गर्दी म्हणजे हीच असावी.
ते मोठं फाटक उघडेपर…

सेंट मार्क्स स्क्वेअर : एक जातिवंत ‘इतालियानो’ अनुभव

Image
जर्मनीच्या नितांतसुंदर ब्लॅक-प्लॉरेस्टला टाटा करून, ऑस्ट्रियातल्या एका भोज्याला शिवून आता इटलीतल्या व्हेनिसकडे निघालो होतो, तिथला ‘सेंट मार्क्स स्क्वेअर’ पाहायला. व्हेनिस शहराबद्दल ‘कालव्यांचं शहर’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या उल्लेखांपलिकडे कधीही काहीही ऐकलेलं नव्हतं. सेंट मार्क्स स्क्वेअरबद्दल तर प्रश्‍नच उद्भवत नव्हता. तरी, ‘व्हेनिससारख्या पुरातन शहरात जाऊन पाहायचं काय, तर एक चौक?’ ही होती माझी पहिली प्रतिक्रिया! चार रस्ते जिथे एकत्र येतात अशी जागा म्हणजे ‘चौक’ ही आपली व्याख्या त्याला कारणीभूत होती. पण पुढल्या काही तासांत मी माझ्यापुरती तरी ती व्याख्या सुधारून घेणार होते.
मुंबईतल्या ‘मे’च्या उकाड्यातून आम्ही युरोपच्या थंडीत पाय ठेवल्याला दहा-बारा दिवस होऊन गेले होते. पैकी गेले पाच-सात दिवस तर आल्प्सच्या अंगणातच होतो. पण इटलीचा रस्ता पकडून जेमतेम तासभरही झाला नसेल तोवर आधीचा आठवडाभर क्षितिजावर सतत सोबत असणारी आल्प्सची शिखरं डोळ्यांसमोरून बघताबघता गायब झाली. त्याच्याच आगेमागे कुठेतरी आमची बस ऑस्ट्रियातून इटलीत शिरली होती. युरोपमध्ये फिरताना ही एक फार मजा होती. कधी या देशातून त्या देशात …

Hidden Figures : एक अप्रतिम सिनेमा

Image
Hidden Figures नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. ५०-६० च्या दशकात अमेरिकेत नासात काम करणार्‍या तीन अ‍ॅफ्रो-अमेरिकन स्त्रियांची सत्यकथा आहे. कॅथरिन जॉन्सन, मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉन.

अत्यंत हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या या तिघींना कामाच्या ठिकाणी सतत वर्णभेदाला तोंड द्यावं लागलं; त्यांच्या पात्रतेच्या मानानं हलकी कामं करावी लागली; तरीही त्याबद्दल गळे काढत न बसता त्या ठामपणे आपली योग्यता संधी मिळेल तिथे सिद्ध करत राहिल्या.

नासातर्फे १९६२ साली जॉन ग्लेनला अवकाशात पाठवण्यात आलं; तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरणारा पहिला अंतराळवीर ठरला. या प्रोजेक्टसाठी नासात विविध पातळीवर जी कामं सुरू होती त्यात अनेक 'मानवी कम्प्युटर्स' काम करत होते. विविध क्लिष्ट गणिती आकडेमोडी, समीकरणं सोडवणे हे त्यांचं मुख्य काम. त्यात अनेक स्त्रिया होत्या; कृष्णवर्णीय स्त्रियाही होत्या.

कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी जेवणाची वेगळी जागा, वेगळी टॉयलेट्स, त्यांनी हात लावलेल्या कॉफीपॉट्समधून इतरांनी कॉफी न घेणे इत्यादी प्रसंग, तपशील अगदी सहजगत्या पण खूप भेदकपणे दाखवले आहेत. ते पाहताना आत कुठेतरी खूप तुटतं; पण त्याच…

सेल्फी

आज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनचखूप नाचतेय, गातेय, आनंद साजरा करतेय...
गेली २-३वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायलालागलीहोती; तिच्या धाकट्या जावेनंतिलातीसवयलावलीहोती. पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं.
जावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय!” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र आणि जीन्स! कुछ मजा नहीं आ रहा था! आपला पंजाबी ड्रेसच बरा! जाऊ किती छान राहायची; पंजाबी ड्रेस क्वचितच घालायची; घातला तरी बिनओढणीचा; खांद्यांपर्यंत केस, मोकळे सोडलेले; बाहेरून आली की गॉगल केसांत सरकवलेला...
ती जावेसारखं होण्याचा हळूहळू प्रयत्न करणार होती.
त्यादिवशी रात्रीची जेवणं उरकून मागचं आवरताना ती त्याच विचारांत होती. ओटा पुसताना बांगड्या मध्येमध्ये येत होत्या... काढूनच टाकाव्यात का, जावेच्या हातात तर कधीच नसतात;…

मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!

ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई, हे घरी बनवलंय? मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो !! ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते!! मी : 😐😐
*
ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई, माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक, मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲
*
ती : ताई, लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं, उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो, मस्त असतोय,तो का नाही आणत? मी : 😒😒
*
ती : ताई, हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का? ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑
*
ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई,बारहून हा डबा स्वस्त पडतो ? मी : काय माहित! डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का?? डी-मार्टातून नाही आणत?? मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना? ती : 🙆🙆
*
ती : (भुवया उडवत, डोळ्यांत चमक) ताई, कालचा पेपर वाचला का?
मी : का? काय झालं?
ती : बगीतली का काय बातमी?? (१२ सप्टेंबरला ओ.बि.ला.च…