Posts

Showing posts with the label माहितीपट

टुमॉरो वुई डिसअपिअर

दिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्‍यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे... यातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत! या वसाहतीत राहतो एक कठपुतली कलाकार - पुरन भट. त्याच्या पाठोपाठ कॅमेरा त्या वसाहतीतून फिरायला लागतो. अरुंद गल्लीबोळ, घरांची खुराडी, उघडी गटारं, अस्वच्छता... पुरनला हिंदी सिनेगीतांची आवड असावी. ती गाणी ऐकता ऐकता तो आपल्या कठपुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी करताना दिसतो; नवीन काही कठपुतळ्या तयार करताना दिसतो. आपल्याला तो त्याच्या कठपुतळ्यांचं कलेक्शनच दाखवतो. एका कोंदट, अंधार्‍या खोलीत त्याने त्या सार्‍या बाहुल्या ठेवल्या आहेत. त्यांच्या गराड्यातच एका खुर्चीवर तो बसतो. पण त्याला तिथे खूप बरं वाटतं आहे. पुरन परदेशांमधे अनेक ठिकाणी आपली कला सादर करून आलेला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष...