Posts

Showing posts from July, 2009

जोडी नं. १

(दि. १६ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.)
--------------------------------------------------------------------------------

सबसे फेवरिट जोड़ीसुजातामागच्या बुधवारी आमच्या शाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचं चर्चासत्र होतं। (त्याचत्याच विषयांवर ‘सतरा’वेळा चर्चा करायची असेल की त्याला चर्चा‘सत्र’ म्हणतात - ही त्या शब्दाची फोड अर्थातच ‘की’ची!) विषय होता ‘परिक्षा आणि निकालांना तोंड कसं द्यावं’. त्यादिवशी शाळेचे रोजचे तास झाले नाहीत. घरी दादानं त्यावरून उगीच कावकाव केली - "नववीला कश्याला हवं ते डॅम सेमिनार?" (कॉलेजला जातो म्हणून चर्चासत्र शब्द वापरायची याला लाज वाटते; ‘डॅम सेमिनार’ म्हणे!)... "आमच्या वेळी कुठे होतं असलं काही? "... (मग मी काय करू त्याला?)... "उगीच शाळा बुडवून तिथे फालतूपणा करत बसणार तुम्ही! " (हा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा लेक्चरच्या नावाखाली कॉलेजमध्ये काय करायला जातो ते विचारा ना याला!)...
पण दादाचं एक मात्र बरोबर होतं - दहावीला परिक्षेची तयारीबियारी करावीच लागते पण नववीला कश्याला? पण तिथे जावं तर लागलंच आम्हाल…