Posts

Showing posts from April, 2020

पुस्तक परिचय : Milk Teeth (Amrita Mahale)

Image
Lockdown book #5 १९९० च्या  दशकाच्या अखेरीस  कात टाकू पाहणारं मुंबई शहर आणि त्या पार्श्वभूमीवरची माटुंग्यातल्या एका जुन्या इमारतीची कथा - असं साधारण synopsis वाचून हे पुस्तक घ्यावंसं वाटलं. इमारत खूप जुनी झाली आहे, तिथल्या भाडेकरूंना बाहेर काढून त्याजागी काहीतरी चकाचक टोलेजंग उभं करण्याचा मालकाचा डाव आहे. त्याविरोधात भाडेकरू एकत्र येऊन काही एक धोरण ठरवण्याचं बघतायत. त्यांच्यात मतभेद आहेत, गटबाजी आहे... इमारतीचं भवितव्य काय असेल या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा, एक प्रेमाचा त्रिकोण, तेव्हाच्या मुंबईतली तरुणाई, त्यांच्या बालपणीच्या आठवणी, जागतिकीकरणाचे छोटे छोटे पैलू, मुंबईसारख्या शहराची त्यामुळे होणारी घुसळण... अशी ही कादंबरी आहे. बाबरी घटना, जातीय दंगली, बॉम्बस्फोट हे सर्व झेलून जागतिकीकरणाला सामोरी जाणारी मुंबई- मराठी मध्यमवर्गीय नायिकेच्या दृष्टीकोनातून मांडलेली- पुस्तकात छान उतरली आहे. मुंबईवर प्रेम असणार् ‍ यां वाचकांना ते बारीकसारीक सगळं टिपायला आवडेल. कथानकात इमारतीचं रूपक माझ्या अपेक्षेपेक्षा अगदीच थोडं वापरलं आहे. प्रेमाच्या त्रिकोणा

पुस्तक परिचय : Hello, Bastar (Rahul Pandita)

Image
Lockdown book #4 पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर पहिली प्रतिक्रिया - Mixed feelings! नक्षलवादी चळवळीबद्दल माझ्यासारख्यांना पेपरमध्ये वगैरे वाचून तेवढं माहिती असतं. आदिवासी भागात, जंगलात त्यांची चळवळ, सुरक्षा दलांवरचे हल्ले, यांच्या त्या-त्या वेळच्या बातम्या मागे पडल्या की तो विषय शहरी विचारांच्या परिघाबाहेर जातो; पुन्हा तशी काही घटना घडेपर्यंत... हे पुस्तक (परत एकदा, माझ्यासारख्यांना) त्यापलिकडे नेतं. लेखक राहुल पंडिता या पुस्तकाची पूर्वतयारी म्हणून नक्षलवाद्यांच्या दलाबरोबर जंगलात राहिले. त्याशिवाय त्यांनी काही मोठ्या माओवादी नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. नक्षलवादी, खरंतर माओवादी चळवळीचा (दोन्हींत नेमका काय फरक आहे ते पुस्तकात सुरुवातीला सांगितलं आहे) इतिहास, कार्यपद्धती, देशाच्या वेगवेगळ्या भागांतला त्यांचा प्रभाव, राजकीय नेत्यांची या प्रश्नावरची  भूमिका, त्या चळवळीत वेळोवेळी उदयाला आलेले नेते, शक्य तिथे त्या नेत्यांची पार्श्वभूमी, अशी सगळी माहितीची भरपूर जंत्री पुस्तकात येते. या चळवळीची माहिती देणं हाच पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. एक-दोन ठिकाणी असा माहितीपर मजकूर जरा कंट

पुस्तक परिचय : And Then There Were None (Agatha Christie)

Image
Lockdown book #3 कारण अधूनमधून काही classics वाचायची असतात! आजकालच्या thrillersशी या पुस्तकाची तुलना करता कामा नये. विषय, मांडणी, भाषा सगळ्यांतच खूपच फरक पडला आहे... पण १९३९ साली आलेलं पुस्तक आजही वाचावंसं वाटत असेल, त्यात तुम्ही गुंगून जात असाल, वाचत असताना अचानक फोन वाजल्यावर तुम्हाला दचकायला झालं असेल... त्यातली ती कविता तुम्हाला haunting वाटत असेल... खुन्याचं motive अंगावर काटा आणणारं वाटत असेल, त्यामागचं तर्कशास्त्र वाचून तोंडात बोटं घालाविशी वाटली असतील...  तर मधला सत्तर-एक वर्षांचा कालावधी ही एक दुय्यम बाब ठरते.  म्हणूनच, अधूनमधून अशी classics वाचायची असतात!

पुस्तक परिचय : Em and The Big Hoom (Jerry Pinto)

Image
Lockdown book #2 जेरी पिंटो हे पत्रकार म्हणून ठाऊक होते, पण त्यांनी कादंबरीलेखनही केलंय हे किंडलमुळे समजलं. 'एम अँड द बिग हूम' ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या मनोविकारग्रस्त आईची कथा आहे. त्यांच्या आईच्या या विकारांचा स्पॅन खूप मोठा होता. विनाकारण बडबड, फकाफका बिड्या पिणं, गोड खाण्याला धरबंध नसणं (एका चहाच्या कपात ६-७ चमचे साखर) ते नर्वस ब्रेकडाऊन, हॅलुसिनेशन्स, डिप्रेशन अटॅक्स, घरातच आत्महत्येचे अनेकवेळा प्रयत्न, त्यातले काही गंभीर - इथपर्यंत सर्व प्रकारांना त्या कुटुंबाने तोंड दिलं. जेरी पिंटो आणि त्यांची सख्खी मोठी बहीण दोघांनी आपल्या आईशी मारलेल्या गप्पांमधून प्रामुख्याने सर्व कथा समोर येते. त्यांची आई गप्पीष्ट होती, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची होती, सेक्ससारख्या अवघड विषयांवरही ती आपल्या मुलांशी खुला संवाद साधायची. त्यांच्या गप्पा आणि लेखकाचं प्रथमपुरूषी निवेदन - या सगळ्यावर आईच्या विकारांचं मळभ आहे, तरी भाषा खुसखुशीत आहे. Add caption Em - म्हणजे मुलांनी आपल्या आईचं ठेवलेलं लाडकं नाव. पुस्तकात आईचं नाव 'इमेल्डा' आहे. बोलता बोलता आई

पुस्तक परिचय : The Courier (Kjell Ola Dahl)

Image
Lockdown मध्ये वाचलेलं पहिलं पुस्तक : The Courier (Kjell Ola Dahl) १९४२ साली ऑस्लोत झालेली एका तरुण स्त्रीची हत्या, तिच्या नवर् ‍ यावरच त्या हत्येचा आळ, पण तो त्याच रात्री गायब होतो, त्यांची मुलगी तेव्हा काही महिन्यांची असते. पुढे तो माणूसही मृत घोषित होतो, मात्र २५ वर्षांनंतर पुन्हा ऑस्लोत अवतरतो, आपल्या मुलीला भेटण्यासाठी, आणि आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी... १९४२ आणि १९६७ सालांमध्ये कथानक आळीपाळीने ऑस्लो-स्टॉकहोम-ऑस्लो अशा पुढेमागे उड्या मारतं. सुरूवातीला आणि शेवटी सध्याच्या काळाचा संदर्भ येतो. त्या कुटुंबाला ओळखणारी, नाझी रेझिस्टन्सशी संबंध असणारी इतर पात्रं कादंबरीत आहेत. १९४२ सालातल्या घटना दुसर् ‍ या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडतात. मात्र ही पार्श्वभूमी गरजेपुरतीच घेतली आहे. एकूण रहस्याची उकल, पात्रांचे दृष्टीकोन खूप बारकाईने येतात. ते समजून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी उपयोगी ठरते. त्यामुळे वातावरणनिर्मिती जबरदस्त झाली आहे. कादंबरी अगदी गुंगवून ठेवते. मला रिलेट झालेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे - आमच्या उत्तर युरोप सहलीदरम्यात ऑस्लोत आम्ही चालत चालत जिथे ज