Posts

Showing posts with the label माहेर दिवाळी अंक

परिघावरून

एके दिवशी सकाळी... गजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला. त्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली. "राघवऽऽ" राघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला. चहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आ...

तीन तिघाडा...

वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या. समोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का? किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का? पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते; ...