Posts

Showing posts from February, 2017

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं!

साधारण दीड व र्षां पूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात ! मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एक खूप जुनं इंग्रजी पुस्तक ! पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच , शिवाय दुसर्‍या महायुद्धाशी ही होता . ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलच