Posts

Showing posts from November, 2023

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

Image
  स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती. अचानक दिसलेली एखादी बाग छान वाटली तर अर्धा दिवस तिथेच घालवायलाही आमची हरकत नव्हती. स्टॉकहोममध्ये पाय ठेवल्यापासूनच तिथल्या भुयारी रेल्वे नेटवर्कच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे ठिकाण कोणतंही असो, तिथे जाण्यासाठी भुयारी रेल्वे घ्यायचीच हे पक्कं होतं. तर त्यादिवशी तसंच मुक्कामाच्या ठिकाणापासून दोन ठिकाणी ट्रेन्स बदलून मध्य स्टॉकहोममध्ये अवतरलो. जमिनीखाली ४-५ मजल्यांवर शांतपणे इकडे-तिकडे धावणार्‍या state of the art trains, स्टॉकहोमच्य