Posts

Showing posts with the label कथा

पहिला धडा

लोकप्रभा दिवाळी अंक कथास्पर्धा (२०१६), प्रथम क्रमांक ------------------------------------         चहा-आंघोळ उरकून , बाहेर पडून केशवनं आपल्या बाईकला किक मारली तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते. दोन वर्षांपूर्वी साधारण याच सुमाराला आप्पांनी त्याला एका नोकरीत चिकटवला होता. त्याला सोयीचं व्हावं म्हणून ऑफिसमधल्या एकांकडून ही सेकण्ड-हॅण्ड बाईक घेतली होती. आप्पा एक मोठ्या सरकारी कंपनीतले तृतीय श्रेणी कर्मचारी ; रहायला कंपनीच्या कॉलनीतल्या ‘ एफ ’ लायनीतलं दोन खोल्यांचं बैठं घर होतं. घराबाहेर बाईक उभी करण्याइतपतही जागा नव्हती. तर घराच्या चतकोर व्हरांड्यात बाईक चढवून ठेवता यावी म्हणून त्यांनी तेव्हा पदरमोड करून एक छोटासा रँपही तयार करवून घेतला होता. कामावर जायचं म्हणून तेव्हा केशव घाईघाईत आवरून साडेसातला घराबाहेर पडायचा. पण आजच्या एक दशांश उत्साहही तेव्हा त्याच्या अंगात नसायचा. रँपवरून बाईक खाली उतरवताना तो रोज एकदा मनोमन चरफडायचा. आप्पांना आपली स्वप्नं कळत नाहीत याचा सगळा तळतळाट तो बाईकच्या किकवर काढायचा. जेमतेम सहा-एक महिनेच त्यानं ती नोकरी केली असेल. नोकरी सोडायची ठरवली ...

परिघावरून

एके दिवशी सकाळी... गजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला. त्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली. "राघवऽऽ" राघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला. चहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आ...

तीव्र कोमल

Image
फक्‍त एक घर तर घ्यायचं होतं. या ‘फक्‍त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता... आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं. "मग काय म्हणायचं?" "Drop the temperature." "म्हणजे तेच ते ना?" "नाही!" हे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh! Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते. असा साध्या साध्या शब्दांचाही कीस पाडणार्‍या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या तरच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं! तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्‍त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आह...