Posts

Showing posts from April, 2015

वस्ती जेव्हा रंगमंच बनते

Image
सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती... ऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष! नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं? ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं. हा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. -----

तीव्र कोमल

Image
फक्‍त एक घर तर घ्यायचं होतं. या ‘फक्‍त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता... आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं. "मग काय म्हणायचं?" "Drop the temperature." "म्हणजे तेच ते ना?" "नाही!" हे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh! Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते. असा साध्या साध्या शब्दांचाही कीस पाडणार्‍या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या तरच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं! तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्‍त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आह