Posts

Showing posts from May, 2020

पुस्तक परिचय : Grey Sunshine: Stories from Teach For India (Sandeep Rai)

Image
Lockdown book #8   Teach for India बद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. त्यातले तपशील आठवत नव्हते, भारतातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी चालू असलेली ही एक चळवळ आहे, एवढं आठवत होतं. त्यामुळे किंडल suggestions मध्ये हे पुस्तक दिसल्यावर लगेच विकत घेतलं. उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी दोन वर्षांसाठी आपलं नेहमीचं काम-नोकरीधंदा बाजूला ठेवून गरीब वस्त्यांमधल्या मुलांच्या प्राथमिक शाळेत शिकवण्याचं काम करायचं, ही Teach for India मागची मूळ कल्पना आहे. त्याची प्रेरणा आहे Teach for America या मोहिमेत. लेखक संदीप राय या Teach for America मोहिमेत सामिल झालेले; अमेरिकेतल्या गरीब मुलांच्या शाळेत शिकवण्याचा अनुभव असणारे; भारतात शाहीन मिस्त्री यांनी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याला हातभार लावण्यासाठी, आपल्या अनुभवांचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी म्हणून इथे आले. त्यानंतरच्या दहा-एक वर्षांच्या वाटचालीवर आधारित हे पुस्तक आहे. या मोहिमेत सामिल झालेले काही तरुण-तरुणी, गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळांत शिकवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी खाल्लेले टक्केटोणपे, त्यातून पुढे त्यांची त्या-त्

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

Image
उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते. आता आणखी एक कल्पना करून बघा- एक सताड उघडी सूटकेस. आत दिसतंय बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं एक घर. घराचा दर्शनी भाग पुरता विस्कटलेला. भिंती मोडून पडलेल्या, आतल्या सळ्या अस्ताव्यस्त बाहेर आलेल्या. खोल्यांमधल्या वस्तू कालपर्यंत अगदी व्यवस्थित, नीटनेटक्या असाव्यात; आता त्या स्फोटामुळे धुरकट झालेल्या, अवकळा आलेल्या. अगदी आता-आतापर्यंत त्या खोल्यांमध्ये माणसांचा वावर असावा; पण आता ते घर उजाड, भकास, सुनसान झालंय. हिंसेचं असं उघडंवाघडं रूप पाहून ती सूटकेस पटकन बंद करून टाकाविशी वाटते. पण ते शक्य नाहीये. आणि ही एकच सूटकेस नाही, अशा ओळीने नऊ सूटकेसेस विध्वंस घेऊन समोर उभ्या ठाकल्या आहेत... हे आहे ‘अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज’, एक

पुस्तक परिचय : Mr. Penumbra’s 24-hour Bookstore (Robin Sloan)

Image
Lockdown book #7 या पुस्तकाचं एका ओळीत वर्णन करायचं तर ’नव्या युगाचं, नव्या पिढीचं, वेगळंच झकास पुस्तक’ ! पण मग नव्या पिढीच्या या पुस्तकाच्या शीर्षकात एक bookstore कसं काय? तर, इंटरनेटी तंत्रज्ञान आणि प्राचीन छापिल पुस्तकं यांचे ऐसपैस चौपदरी रस्ते या पुस्तकाच्या चौकात एकत्र येतात. तिथे आपण वाचक उभे असतो, सुरक्षितपणे, traffic island च्या आत... या रस्त्यांवरून आपल्या दिशेनं येतात पुस्तकांच्या जगतात रमलेले, त्यापल्याड पाहू न शकणारे पन्नाशी आणि त्यापुढचे ’अंकल-आँटी-आजोबा’ वयाचे लोक आणि तंत्रज्ञानात मुरलेले, सिलिकॉन व्हॅलीत जमेल त्या प्रकारे घाम गाळणारे, इंटरनेटी जगतात व्यवसायाच्या नवनव्या वाटा शोधणारे तरुण तंत्रज्ञ... ते चौकात वाचकांसमोर ज्या प्रकारे एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या जगतात प्रवेश करतात, आणि मग जी काही मजा घडते, ते म्हणजे हे पुस्तक. Mr Penumbra च्या या पुस्तकाच्या दुकानाच्या माध्यमातून एका ५०० वर्षं जुन्या कोड्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू असतो. ते कोडं एका तितक्याच जुन्या पुस्तकात सांकेतिक स्वरूपात लिहिलेलं असतं. ते कोडं सुटण्यासाठी हे पुस्तकांचं दुकान २४ तास चालू ठ

पुस्तक परिचय : Vanishing Girls (Lisa Regan)

Image
Lockdown book #6 असं प्रथमच झालं, की unputdownable, heart-stopping thriller म्हणून वाचायला घेतलेलं पुस्तक अखेर जरा सपकच निघालं. अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावातली एक तरुण मुलगी बेपत्ता होते, बराच तपास करून पोलिसांना तिच्याबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नसतात. आणि मग एक दिवस आणखी मुलगी अचानक सापडते, जी हरवलेली आहे हेच कुणाला माहिती नसतं, कादंबरीची पोलिस नायिका एका अपघातातून कशीबशी वाचते, त्याच अपघातात तिला त्या गुन्ह्याचा एक धागा गवसतो, (तो धागा अंतिमतः फारच far-fetched वाटला मला.) त्यावेळी ती वेगळ्या कारणाने suspended असते. पण ती स्वतःच स्वतः गुपचूप तपास सुरू करते... मग प्रत्येक महत्त्वाचा धागा तिच्याच हाती लागत जातो... आणि शेवटी वाचकांसमोर आयतं ताट वाढलं जातं. यातला गुन्हा, गुन्ह्याची पद्धत heart-stopping आहे खरी, पण narration त्या तोडीचं नाही. Plot थरारक आहे, पण गुन्ह्याची उकल करतानाचे निवेदनातले खेळ तसे नाहीत; फार अपेक्षा ठेवून हे thriller वाचायला घेतलं होतं... पण चालायचंच !