Posts

Showing posts from 2023

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

Image
  स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती. अचानक दिसलेली एखादी बाग छान वाटली तर अर्धा दिवस तिथेच घालवायलाही आमची हरकत नव्हती. स्टॉकहोममध्ये पाय ठेवल्यापासूनच तिथल्या भुयारी रेल्वे नेटवर्कच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे ठिकाण कोणतंही असो, तिथे जाण्यासाठी भुयारी रेल्वे घ्यायचीच हे पक्कं होतं. तर त्यादिवशी तसंच मुक्कामाच्या ठिकाणापासून दोन ठिकाणी ट्रेन्स बदलून मध्य स्टॉकहोममध्ये अवतरलो. जमिनीखाली ४-५ मजल्यांवर शांतपणे इकडे-तिकडे धावणार्‍या state of the art trains, स्टॉकहोमच्य

पुस्तक परिचय : काळे करडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)

Image
गेल्या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक . डिग्री कॉलेज शिक्षणाच्या वयोगटातल्या मुंबईतल्या मराठी मुला - मुलींच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी आहे . त्यांची आपसांतली मैत्री जुळणे , टिकणे , मोडणे . एकमेकांशी शेअरिंग . प्रेमप्रकरणं , सेक्सचा अनुभव . हे सगळं तर आहेच . त्यापलिकडेही व्यक्ती म्हणून त्यांची अन्डर कन्स्ट्रक्शन असणारी जडणघडण , त्यांच्यातली ऊर्जा , हे सगळंही आहे . मुद्दाम सांगण्याचा आव न आणता कथानकात या गोष्टी सहज येत जातात . वातावरणनिर्मिती छान आहे . पुस्तकाची भाषा , पात्रांच्या तोंडचे संवादही अगदी सहज , सोपे आहेत . द यंग अ‍ॅण्ड द रेस्टलेस अशी एक प्रचिती येते . कथानकाचा नायक फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतो . म्हणजे वर्तमानकाळात तो चाळीशीला पोचलेला वगैरे नाही . कॉलेजविश्वातून बाहेर पडून त्याला काहीच वर्षं झाली आहेत . ही सिच्युएशन मला आवडली , त्यामुळे जे घडून गेलं त्याबद्दल सांगताना वेगळा दृष्टीकोन बघायला मिळाला . ( या टाइपच्या पुस्तकांच्या नरेशनच्या दृष्टीने ) कॉलेजजीवनाचा अ

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

Image
रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं? अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला? आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं? आफ्रिकेतले देश इतके गरीब का? चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे? असे एकगठ्ठा प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. जागतिक राजकारण हा काही सर्वसामान्यांच्या आवाक्यातला विषय मानला जात नाही. त्यावर राजकारणी बोलतील, अभ्यासक बोलतील, तो आपला प्रांत नव्हे, असं म्हणून तो सोडून दिला जातो. Prisoners of Geography हे पुस्तक ही सोडून देण्याची मुभा आपल्यापासून हिरावून घेतं. आणि त्यात मजा आहे. एका वाक्यात या पुस्तकाचा गोषवारा सांगायचा, तर जगाच्या राजकारणात जे काही घडत आलेलं आहे, त्यामागे त्या-त्या देशांचं भौगोलिक स्थान, त्यांच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती याच गोष्टी कारणीभूत आहेत, असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. आणि हे इतक्या साध्या-सोप्या भाषेत सांगितलं आहे, की वाचताना आपण त्यात नकळत रमत जातो. पुस्तकात १० विभाग/प्रकरणं आहेत- रशिया, चीन, अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका, मध्य-पूर्व आशिया, भारत-पाकिस्तान, कोरिया-जपान, लॅटिन अमेरिका, आर्क्टिक प्र

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

Image
 बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्‍हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आईचा आजार आणि त्यांची कौटुंबिक वीण हे कादंबरीचं मुख्य कथानक नाही. या गोष्टी नायिकेच्या बालपणीच्या फ्लॅशबॅकमधून आपल्याला समजतात. मुख्य कथानक आहे ते Far Field, म्हणजे काश्मिर खोर्‍यातलं. नायिकेच्या लहानपणी त्यांच्या घरी एकदा काश्मिरी गालिचे, हस्तकला वस्तू वगैरे विकणारा एक विक्रेता येतो- बशीर अहमद. आईची बशीरशी ओळख वाढते. दुपारच्या वेळी तो दारावर आला की आई त्याला घरात घ्यायला लागते. त्याच्याशी ता