Posts

Showing posts with the label दुर्गभ्रमण

गोरखगड ट्रेक

Image
दहा जानेवारीच्या रविवारी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातल्या काही जणांनी गोरखगडाचा ट्रेक करायचा ठरवला. त्याची कुणकुण लागताच गोरखगड खूष झाला. गोरखगड - मुरबाडपासून अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर उभा. मुरबाडहून निघाल्यावर म्हसे गावाकडे जाताना एका वळणानंतर अचानक समोर दिसणारा डावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा. पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते. ट्रेकर्सपैकी काही मंडळींना ते पाहून मनात वाटूनही गेलं असेल की हॅत्तिच्या! इतकसंच तर चढायचं आहे! पण पायथ्याच्या देहरी गावातल्या रस्त्यावर उभे राहून आरामात चहा पिणार्‍या त्या तेवीस जणांपैकी काहींची अवस्था आणखी तासाभराने काय होणारे ते ओळखून गोरखगड त्यांच्याकडे बघून मनातल्यामनात हसत होता. सव्वानऊला मंडळींनी चढायला सुरूवात केली. चढण फार कठीण नव्हती. ज्यांना नेहमीचा सराव होता अशी मंडळी झपाझप पुढे निघाली. हपापत, दमत, हळूहळू चढणार्‍या काहीजणांना मात्र आसपासची सुंदर दृश्यं बघण्याचीही सवड नव्हती. तासाभरानंतर सर्वजण एका ठ...

चार पायऱ्यांचा पर्वत

पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला... "हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला. 'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली. तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं. "सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली. "रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे... नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते...