Posts

Showing posts from January, 2020

न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २) ---------- न्यूझीलंड टूरच्या आधीच्या आठवड्यात टीव्हीवर रॉस टेलरचे इंग्रजी उच्चार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता; तरी त्या देशात फिरताना खास क्रिकेट थीम मनात धरून फिरावं, बघावं असं काही निघताना डोक्यात नव्हतं. तिथे पहिल्याच दिवशी पाहियाच्या समुद्रकिनार्‍यावर (Horotutu Beach) भटकताना ही एक पाटी दिसली आणि तो धागा लक्षात आला. -- ज्ञात माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये १८३२ साली पहिला किकेट सामना खेळला गेला. सामन्याची जागा त्या पाटीच्या आसपास कुठेतरी असावी असं त्यात लिहिलेलं होतं. हा फोटो काढला तिथे आता व्यवस्थित डांबरी रस्ता आहे. समोर समुद्र. म्हणजे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला ते ठिकाण असावं असा आम्ही अंदाज बांधला. आता त्या बाजूला घरं, हॉटेलं वगैरे आहेत. पाहियात क्रिकेटचा उल्लेख अन्यत्र कुठे दिसला नाही. पुढे रोटोरुआतही तसंच. शिवाय

वर्णद्वेष कोळून प्यायलेलं बालपण (पुस्तक परिचय : बॉर्न अ क्राइम, लेखक : ट्रेवर नोआ)

Image
ढोबळमानाने आपल्यासाठी दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष गांधीजींना ट्रेनमधून ढकलून देण्यापासून सुरू होतो आणि नेल्सन मंडेलांच्या सुटकेपाशी संपतो. मंडेला सुटले, त्या देशात लोकशाही सरकार आलं, द.आफ्रिकेची क्रिकेट टीम कलकत्त्यात वन-डे खेळली, इथले क्रिकेट-प्रेमी द.आफ्रिकेच्या खेळाडूंचे फॅन झाले... बस्स! आणखी काय हवं होतं! या सोयिस्कर समजुतीला अगदी सहज जाताजाता, गमतीजमतीत गप्पा मारतामारता जोरदार धक्का देतं Born a Crime : Stories from a South African childhood हे पुस्तक आणि त्याचा लेखक ट्रेवर नोआ. द.आफ्रिकेतल्या वर्णद्वेषावर लोकशाहीनं विजय मिळवलेल्या क्रांतीला ‘ब्लडलेस रेव्हल्युशन’ असं म्हटलं जातं. ट्रेवर नोआ लिहितो- It is called that because very little white blood was spilled. Black blood ran in the streets... पहिल्या काही पानांमध्ये लहान मुलाच्या खोड्या, त्याची हैराण झालेली आई, मायलेकाची झकाझकी असं चित्र उभं करणारं हे पुस्तक कधी या chilling statement पाशी येऊन पोहोचतं कळतच नाही. पहिली काही पानंच वाचून झालेली असतात आणि आपल्याला प्रथमच जाणवतं, की हलक्याफुलक्या भाषेत, खुसखुशीत पद्ध