Posts

Showing posts with the label कथासंग्रह

पुस्तक परिचय : गॉगल लावलेला घोडा (निखिलेश चित्रे) कथासंग्रह

Image
अद्भुत, मॅजिकल रिअ‍ॅलिझम, फँटसी, फिक्शन - असं सगळं मिश्रण असणार्‍या कथा. काही कथांमध्ये sarcasm आहे, आसपासच्या घटनांवर सूचक भाष्य आहे. एखाद्या कथेतला एखादा तपशील एकदम रिलेट होतो आणि वाचताना एक स्पार्क जाणवतो. त्या दृष्टीने 'लोकर्‍या' ही कथा खूप आवडली. तशी प्रत्येक कथेत काही ना काही गंमत आहेच. काही पात्रं एकाहून जास्त कथांमध्ये येतात. ते धागे जुळवतानाही कथांमध्ये गुंतायला होतं. शीर्षककथाच मला तितकीशी कळली नाही. मोठा रिव्ह्यू लिहायची इच्छा असूनही लिहायला जमत नाहीये. त्याला कारणही या कथाच. मी या प्रकारचं एकगठ्ठा काहीतरी पहिल्यांदाच वाचलं. मजा आली वाचायला. पण आस्वादात्मक सविस्तर लिहायचं तर पुन्हा एकदा सर्व कथा वाचाव्या लागतील हे जाणवलं. तरी चुकवू नये असं पुस्तक आहे इतकं नक्की सांगू शकते.

पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

Image
 हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे. कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो. पुस्तकातली पहिलीच (शीर्षक)कथा एक-नंबर आहे, भारी आहे, भन्नाट आहे, झकास आहे! बाळू हा कथानायक, निवेदक. कोल्हापूरजवळच्या खेड्यात दहावी झालेला. आणि आता त्याला कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिथेच तो हॉस्टेलवर राहणार आहे. त्याला हॉस्टेलला सोडायला समस्त घर त्याच्यासोबत कोल्हापूरला आलं आहे- आई, वडील आणि धाकटे दोन भाऊ. एस.टी.तून ते कोल्हापूरच्या स्टँडवर उतरतात. तिथून पायी चालत मार्केटमध्ये, तिथून बस पकडून जरा गावाबाहेर असणार्‍या इन्स्टिट्यूटपर्यंत, आणि इन्स्टिट्यूटच्या मेनगेटपासून बाळूच्या हॉस्टेलच्या खोलीपर्यंत त्या कुटुंबाचा प्रवास, म्हणजे ही ७६ पानी कथा. हा प्रवास लेखकाने असा काही रंगवला आहे, की बस्स! पहिल्या १-२ पानावरच्या पावसाच्या वर्णनापासूनच आपण बाळूच्या छत्रीतून चालायला लागतो. डांबरी रस्त्यावर पडणार्‍या पावसाच्या धारांना दिलेली उपमा, धाकट्या भावाच...

पुस्तक परिचय : तडा (कथासंग्रह, ले. गणेश मतकरी)

Image
अनुभव अंकात मतकरींच्या ’बिनशेवटाच्या गोष्टी’ वाचल्या तेव्हापासून मी त्यांच्या कथालेखनाची फॅन आहे. (या गोष्टींचं नंतर पुस्तक झालं- ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’. ते २-३ वर्षांच्या अंतराने दोनवेळा वाचलं. पुन्हाही कधीतरी वाचू शकते.) त्यानंतर ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे त्यांचे कथासंग्रह वाचले. नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं  पुस्तक  ’तडा’. या कथासंग्रहातल्या दोन कथा मला सर्वात आवडल्या. एक शीर्षककथा ’तडा’, त्यापेक्षाही आवडली ती ’ओळख’ कथा. ‘ओळख’ कथेत आपल्याकडचा एक ज्वलंत सामाजिक मुद्दा ज्या प्रकारे गोवलेला आहे ते मला फार आवडलं. एक-दोन कथा जरा ताणलेल्या/पाणी घातलेल्या वाटल्या. कोणती कथा आवडेल हे जरासं व्यक्तीसापेक्ष असू शकतं. त्यामुळे मुद्दा तो नाही. मतकरी ज्या perspective मधून कोणतीही कथा सुरू करतात आणि पुढे उलगडत नेतात ते note करण्यात मजा येते. टिपिकली कथेत ’पुढे काय होणार?’ किंवा ’शेवटी काय होणार?’ ही वाचकांना उत्सुकता असते, (किंवा तशी असणं अपेक्षित असतं.) पण मतकरींच्या कथांमध्ये destination पेक्षा journey जास्त इंटरेस्टिंग असते. कथांचा जर्म नंतर मनात summarize करायलाही ...

पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)

Image
विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले) ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला.  ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ पुस्तकात हा सगळा काळ येतो. त्यातही केंद्रस्थानी हे पॉर्न बघण्याचं व्यसन आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवण्याचा आपला उद्देश लेखकानं प्रस्तावनेत स्पष्ट केला आहे. ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या एका आळीत घडणारी ही कथानकं आहेत. पहिल्या एक-दोन कथांमध्ये त्या आळीचा tone प्रस्थापित होतो. लेखकानं स्वतः ते जग तेव्हा पाहिलेलं आहे. तिथल्या तरुणाईचा तो सुद्धा एक भाग होता. त्या प्रवाहात ओढला जातानाच अनेक बारीकसारीक गोष्टी त्याच्या मनात...

पुस्तक परिचय : मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह, सतीश तांबे)

Image
  'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' अशी अर्पणपत्रिका पाहून पुस्तक वाचावंसं वाटलं.  बहुतेक कथांचं बीज चांगलंच आहे, पण कथाविस्तार आणि निवेदन मला खूपच पाल्हाळिक वाटलं. सगळ्या कथा प्रथमपुरुषी निवेदनात आहेत. पुस्तकाच्या मध्यात त्याचाही जरा कंटाळाच आला. (लेखकाची शैलीच तशी आहे, की या पुस्तकात हा योगायोग आहे, ते माहिती नाही.) कथा प्रथमपुरुषी केव्हा लिहितात, केव्हा लिहावी, याबद्दलचे काही ठोकताळे असतील तर मला कल्पना नाही. पण सरसकट सगळ्या कथा तशाच, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मध्यमवर्गीय वातावरण, तशीच पात्रं, भाषा साधी-सोपी, समोर बसून गप्पाटप्पांत आठवणी/अनुभव सांगावेत अशी शैली - या पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी. पण अर्पणपत्रिकेतला भेदकपणा एकाही कथेत मला तितकासा दिसला नाही. त्यातल्या त्यात ‘तळघरातील बुरखेधार्‍याची गोष्ट’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘बेडरूम तिथे पिकासो’ या तीन कथा चांगल्या वाटल्या. काही वर्षांपूर्वी या पुस्तकावर पेपरमध्ये, फेसबूक पोस्टींतून बरंच वाचलं होतं. म्हणून फार अपेक्षेने पुस्तक वाचलं; पण मला विशेष आवडलं नाही.

फॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर

कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक! आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं... पुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं! दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं? कथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय, चांगली स्थळं येतच नाहीयेत या विचारानं तो हतबलही झालेला आहे. ओळखीपाळखी...

पुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

Image
कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं. पुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाही...