पुस्तक परिचय : गॉगल लावलेला घोडा (निखिलेश चित्रे) कथासंग्रह


अद्भुत, मॅजिकल रिअ‍ॅलिझम, फँटसी, फिक्शन - असं सगळं मिश्रण असणार्‍या कथा.

काही कथांमध्ये sarcasm आहे, आसपासच्या घटनांवर सूचक भाष्य आहे. एखाद्या कथेतला एखादा तपशील एकदम रिलेट होतो आणि वाचताना एक स्पार्क जाणवतो. त्या दृष्टीने 'लोकर्‍या' ही कथा खूप आवडली.
तशी प्रत्येक कथेत काही ना काही गंमत आहेच. काही पात्रं एकाहून जास्त कथांमध्ये येतात. ते धागे जुळवतानाही कथांमध्ये गुंतायला होतं.
शीर्षककथाच मला तितकीशी कळली नाही.

मोठा रिव्ह्यू लिहायची इच्छा असूनही लिहायला जमत नाहीये. त्याला कारणही या कथाच. मी या प्रकारचं एकगठ्ठा काहीतरी पहिल्यांदाच वाचलं. मजा आली वाचायला. पण आस्वादात्मक सविस्तर लिहायचं तर पुन्हा एकदा सर्व कथा वाचाव्या लागतील हे जाणवलं.

तरी चुकवू नये असं पुस्तक आहे इतकं नक्की सांगू शकते.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३