Posts

Showing posts from June, 2009

एव्हरेस्ट आणि अस्मिता

(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.) ॥१॥ किर्ती आमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता? शर्मा की देशपांडे?... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला! या त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल

घरपोच सुख!

आपण घाईघाईनं आवरून घराबाहेर पडतो. विशिष्ट वेळेत आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं. दवडायला एक मिनिटही हाताशी नसतं. सुदैवानं कोपर्‍यावरच एक सोडून दोन रिक्षा दिसतात. आपण तिथे पोहोचण्यापूर्वी त्या रिक्षांना दुसरं कुणीही बोलवत नाही. त्यामुळे दुप्पट घाई करून आपण तिथे जाण्याचं सार्थक होतं. रिक्षावाला आपण सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब यायला तयार होतो. आपल्या चेहेर्‍यावर तिप्पट आनंद झळकायला लागतो. आपण सुटकेचा निःश्वास टाकून रिक्षात बसतो... सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं हो? उपलब्ध सार्वजनिक वाहनानुसार या प्रसंगातले तपशिल थोडेफार इकडे-तिकडे होतील इतकंच! बसस्टॉपवर पोहोचलं की जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटांत बस यावी, बसमध्ये थोडीफार गर्दी असली तरी हरकत नाही, व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी पुष्कळ आहे किंवा टॅक्सीवाल्यानं अजिबात खळखळ न करता आपण म्हणू त्याठिकाणी यायला लगेच तयार व्हावं... इतक्याच तर माफक अपेक्षा असतात आपल्या! पण आपल्यासारख्या साध्याभोळ्या, गरीब बिचार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या नशिबी हे असं सार्वजनिक-वाहन-सुख फार अभावानंच येतं। तरी कधीकधी आपल्या पदरातही अनपेक्षितरीत्या असं एखादं दान

एक्झिट पोल

(२८ मे २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत प्रकाशित झालेला हा लेख. किर्ती आणि सुजाता या दोन मैत्रिणी पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत.) ॥१॥ सुजाता आई म्हणते - त्या ‘जागतिक बदलाचे वारे’ निबंधापासून एक बरं झालंय... मी ऑलमोस्ट दररोज पेपर वाचायला लागलेय... ‘ऑलमोस्ट’ म्हणे! मला तर आईचं काही कळतच नाही... एखादी गोष्ट केली तरी बोलायचं; नाही केली तरी बोलायचं! पण ते जाऊ दे. तर मी काय सांगत होते की रोजचा पेपर... आता तो वाचायलाच हवा ना... बाई कधी कश्यावर लिहायला सांगतील काही नेम नाही. आणि पेपर वाचून सुद्धा काय काय नवीन नवीन गमती जमती कळतात!... ३-४ दिवसांपूर्वीचे सगळे पेपर्स त्या ‘एक्झिट पोल्स’नि भरून वाहत होते. ‘शपथविधी’सारखाच ‘की’नं याचाही विग्रह केलाय (मराठीच्या बाईंची ही एवढी एकच सूचना ती इमानेइतबारे पाळते) - पोल्सनंतर, म्हणजेच निवडणुकांनंतर, आपली ‘एक्झिट’ होणार की नाही हे प्रत्येक पक्षाला चाचपून पहायचं असतं म्हणून ते जी पाहणी करतात त्याला ‘एक्झिट पोल्स’ म्हणतात म्हणे! काय पण लांबलचक विग्रह!... आणि वर म्हणते कशी - हा ही मध्यमपदलोपी समासच, फक्त यात बऱ्याच मध्यमपदांचा लोप होतोय म्