Posts

Showing posts with the label लघु-लघुकथा

शेवटचा मोदक (शतशब्दकथा)

  झालं एकदाचं, आता शेवटचा मोदक...! पारी हातात गोल गोल फिरायला लागण्याच्या बेतात होती. एकीकडे सारणाचा अंदाज घेतला गेला. शेवटचा मोदक वळल्यावर अगदी थोडंसंच सारण उरलं असतं. मग आणखी थोडीशी उकड घेऊन पारी वाढवण्यात आली. मोठी पारी, हातात गोल गोल फिरायला लागली. पारीच्या गोल वाटक्यात शेवटचं सारण भरलं गेलं. शेवटचा घाणा वाफवायला ठेवला गेला. पुढच्या दहा मिनिटांत जेवणाची तयारी केली गेली. गरमागरम मोदकांचा शेवटचा घाणा आधी टेबलावर आला. आकारामुळे उठून दिसणारा शेवटचा मोदक सर्वात आधी उचलला गेला. आणि तूप घेण्यासाठी त्याचं नाक उकललं गेलं... Just like that! अक्षरशः दहा मिनिटांपूर्वीच, पेशन्स संपल्याने, शेवटचा मोदक वळायला जरा जास्तच कसरत करावी लागली होती...  

सेल्फी

आज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं ; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनच खूप नाचतेय , गातेय , आनंद साजरा करतेय... गेली २ - ३ वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायला लागली होती ; तिच्या धाकट्या जावे नं तिला ती सवय लावली होती . पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं. जावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय!” जाऊ म्हणाली होती . त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढ ला ; पण , घट्ट चापून बांधलेले केस , टिकली , मंगळसूत्र आणि जीन्स! कुछ मजा नहीं आ रहा था! आपला पंजाबी ड्रेसच बरा! जाऊ किती छान राहायची ; पंजाबी ड्रेस क्वचितच घालायची ; घातला तरी बिनओढणीचा ; खांद्यांपर्यंत केस , मोकळे सोडलेले ; बाहेरून आली की गॉगल केसांत सरकवलेला... ती जावेसारखं होण्याचा हळूहळू प्रयत्न करणार होती. त्यादिवशी रात्रीची जेवणं उरकून मागचं आवरताना ती त्याच विचारांत होती. ओटा पुसताना बांगड्या मध्य...