पुस्तक परिचय : US AGAINST YOU (Frederik Backman)

BEARTOWN या पुस्तकाबद्दल मागे लिहिलं होतं. 

ही तीन कादंबर्‍यांची मालिका आहे. त्यातला दुसरा भाग US AGAINST YOU वाचला.

पहिल्या कादंबरीत हॉकी आणि तरुण हॉकी खेळाडू ही प्रमुख पात्रं होती. त्यांची एनर्जी होती.
दुसर्‍या भागात खेळाभोवतीची इतर परिस्थिती, राजकारण, पैसा, हेवेदावे, चढाओढ, खेळाचं मॉनेटायझेशन या बाबी येतात. आज कोणत्याही व्यावसायिक खेळासोबत या गोष्टी असतात, होतातच, घडतातच. तो प्रश्न नाही. पण या गोष्टींबद्दल बोलताना हॉकी आणि तरुण मुलं काहीशी बाजूला सारलेली आहेत.

पहिल्या भागात जी एक भूतो न भविष्यति घटना घडते, त्याचे पडसाद सर्व कोनांमधून दुसर्‍या भागात मांडलेले आहेत. त्यात अनेक बॅकस्टोरीज आहेत. खेळाशी निगडीत, तसंच घरगुती नातेसंबंधांच्या पातळीवरच्याही आहेत.

लेखकाच्या शैलीमुळे पुस्तक पुढे पुढे वाचलं जातं. पण कुठलंच पात्र खणखणीतपणे समोर येत नाही. किंबहुना, या भागाचा तो उद्देशच नसावा. त्या घटनेमुळे बेअरटाऊनला आलेली मरगळ, एकसाचीपणा, गावातल्या हॉकीचं लटकतं भविष्य, संघबांधणीला बसलेला झटका असं सगळं अगदी धीम्या गतीने मांडलेलं आहे.

मुलांच्या संघाची नवीन कोच - हे एक नवीन पात्र आहे. ते पात्र मजा आणतं खरं, पण एकंदर पहिल्या पुस्तकाच्या तुलनेत हा दुसरा भाग मला मध्ये मध्ये कंटाळवाणा वाटला.

तरी, काही काळाने तिसरा भाग वाचणारच आहे.

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार)

पुस्तक परिचय - White Rose, Black Forest (Eoin Dempsey)

पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)