पुस्तक परिचय : The 1982-83 Bombay Textile Strike (Hub Van Wersch)
The 1982-83 Bombay Textile Strike And the unmaking of a Labourers' City (Hub Van Wersch) Social Anthropologist लेखकाने मुंबईत गिरणी कामगारांसोबत राहून, त्यांच्या मुलाखती घेऊन, तेव्हाची वर्तमानपत्रं पालथी घालून, तत्कालीन सामाजिक, राजकीय नेत्यांशी बोलून तपशीलांचं, माहितीचं वस्तुनिष्ठ ॲनालिसिस करून हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला भाग - The Story Of The Strike. यातलं पहिलं प्रकरण Significance of the Textile Industry जबरदस्त आहे. भारतातला आणि खासकरून मुंबईतला कापड गिरण्यांचा इतिहास, सामाजिक-व्यापारी महत्त्व, इथली सामाजिक वीण घडवण्यामागे या उद्योगाचा असणारा सहभाग, कापड उद्योग आणि तंत्रज्ञान, कामगार संघटना, जुने संप/संपांचे प्रयत्न, असं बरंच...बरंच...बरंच...काय-काय त्यात वाचायला मिळतं. वाचताना कुठे कुठे पेशन्सशी हाणामारी करावी लागते. पण घडलं हे असं असं घडलं, हा लेखनाचा सूर पाहून आपण पुढे वाचत जातो. हे रिसर्च पद्धतीचं लेखन आहे याची सतत आठवण ठेवली तर जरा सोपं जातं. पुढची दोन प्रकरणं ( The Strike, Strike Strategies) प्रत्यक्ष संपाबद्दल बोलतात. पॉप्युल...