Posts

Showing posts with the label मुंबई

पुस्तक परिचय : क्लोज एन्‌काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

Image
पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं. लेखक लहानपणी कामाठीपुर्‍यात राहत होता. त्या काळातल्या या आठवणी, व्यक्तिचित्रं, अनुभव आहेत. एकूण २४ लेख आहेत. काही लहान, काही मोठे. त्यातली ७० आणि ८० च्या दशकातली कष्टकरी, बकाल, हलाखीची मुंबई फार रंजक आणि भेदक दोन्ही आहे. कामाठीपुर्‍यातल्या १६ गल्ल्या, तिथे राहणारे भाजीवाले, छोटे भंगार व्यापारी, छोटी-मोठी दुकानं नाहीतर हॉटेलं चालवणारे व्यावसायिक, या सार्‍यांचं आपांपसांतलं नातं, शेजारधर्म, हेवेदावे, चढाओढ, खुन्नस, काळा बाजार, हिंसाचार, हिंदु-मुसलमान तेढ... त्यांतलंच शाळकरी मुलांचं आपलं विश्व, मैत्री, आसपासचं मोठ्यांचं जग समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न... हिंदी सिनेमे, गल्ली क्रिकेट, स्थानिक राजकारण... खास बंबैय्या हिंदी-मराठी बोली... मुंबई शहराचा एक लहानसा काळ-तुकडाच पुस्तकातून समोर येतो, आणि तो पुढे पुढे वाचत रहायला आपल्याला उद्द्युक्त करतो. कामाठीपुरा या उल्लेखाने ...

एक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात

Image
नौदल सप्ताहाची जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली आणि अंगात एकदम उत्साह संचारला. विक्रांत या आपल्या युध्दनौकेला भेट देण्याची माझी फारा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली होती. २८ नोव्हेंबर २००९ ते ६ डिसेंबर २००९ अशी (फक्त) आठ दिवस विक्रांत सर्वसामान्यांसाठी खुली राहणार होती. लग्गेच कॅलेंडर काढून सोयीचा २९ नोव्हेंबरचा रविवार मुक्रर करून टाकला. भेट द्यायची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी छापली होती. ‘सकाळी लवकरच तिथे पोचू, म्हणजे काही भानगडच नको’ असं म्हणून मी घरादाराला नवाच्या ठोक्यालाच बाहेर काढलं. दरम्यान, विक्रांतला भेट देऊन आलेल्या काही जणांचं ब्लॉगरूपी लेखन नेटवर सापडलं. ते वाचून काढलं. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’(विक्रांत जिथे नांगरून ठेवली आहे तिथे जाण्याचा नौदलाच्या ताब्यातला दरवाजा) सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता. त्यानं टॅक्सी बरोब्बर उलट दिशेला नेली. मग यू टर्न मारून काही ठिकाणी विचारत विचारत शेवटी ठीक ११ वाजता आमची वरात त्या टायगर गेट परिसरात पोचली. टॅक्सीतून उतरल्यावर समोर...