Posts

Showing posts from September, 2020

पुस्तक परिचय : The Cases That India Forgot (लेखक - चिंतन चंद्रचूड)

Image
  We often tend to think of judgements as the text, whereas judgements can more accurately be conceived of as performance, as the culmination of a process. - चिंतन चंद्रचूड देशभरात गाजलेल्या, खळबळजनक, सनसनाटी कोर्टकेसेसबद्दल वाचण्यात कुणालाही जास्त रस असतोच. पण अनेक केसेस अशाही असतात ज्यांची त्या-त्या वेळेला चर्चा होते आणि नंतर त्या विस्मृतीत जातात. या पुस्तकात अशाच विस्मृतीत गेलेल्या १० कोर्ट केसेसचं वर्णन आहे. या सगळ्या केसेस हायकोर्टात नाहीतर सुप्रीम कोर्टात लढवल्या गेल्या. त्यांचे निकाल आपल्या देशाच्या सामाजिक, न्यायिक जडणघडणीवर दूरगामी परिणाम करणारे होते. कायद्याच्या अभ्यासकांमध्ये या केसेस आजही परिचित आहेतच; मात्र सर्वसामान्यांना त्याचा विसर पडलेला आहे. पुस्तकात या १० केसेस ४ प्रकारांत विभागलेल्या आहेत - Politics, Gender, Religion, National Security. यातल्या काही केसेस १९५०-६०च्या दशकातल्या आहेत, तर काही बर्‍यापैकी अलिकडच्याही आहेत. न्यायालयीन खटल्यांचं वर्णन, वकिलांचे युक्तीवाद, त्यामागचं त्यांचं कसब, निकालांचा ऊहापोह या बाबी त्यातल्या कायदेशीर भाषेमुळे वाचायला क

पुस्तक परिचय : A Grave For Two (Anne Holt)

Image
चांगल्या इंग्लिश थ्रिलर्सची मी फॅन आहे. किंडलवर साहजिक तशी पुस्तकं धुंडाळली जातातच. या कॅटेगरीत ’नॉर्डिक थ्रिलर्स’ किंवा ’स्कँडेनेव्हिया थ्रिलर्स’ असा एक प्रकार सतत दिसतो. बरीच आधी न ऐकलेली पुस्तकं त्यात कळली. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यात बर्‍याच स्त्री-लेखिका आहेत. त्यात हे एक पुस्तक सारांशावरून चांगलं वाटलं म्हणून घेतलं. नॉर्वेची वर्ल्ड नं. वन स्कीइंग चॅम्पियन कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एका डोपिंग प्रकरणात अडकते. तिचं करिअर तर पणाला लागतंच, शिवाय काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विंटर ऑलिंपिक्समधल्या नॉर्वेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह लागतं. तिचे वडील म्हणजे नॉर्वेच्या स्कीइंग फेडरेशनमधलं एक प्रभावी व्यक्तिमत्व असतं. त्यांच्या आपल्या मुलीच्या स्कीइंग-करिअरवर खूप आशा असतात. त्यांची खात्री असते, की आपल्या मुलीला यात गोवलं गेलं आहे. ते एका स्त्री वकिलाकडे ही केस सोपवतात. मात्र कोर्टात लढण्यासाठी नव्हे, तर त्यापूर्वीचा गुपचूप तपास करण्यासाठी. ही वकील एकेकाळी नावाजलेली, पण आता परागंदा होण्याच्या वाटेवर असलेली. परागंदा होण्याची कारणं त्या स्कीअरच्या वडिलांना माहिती असतात. त

पुस्तक परिचय : Don't Worry, He Won't Get Far on Foot (John Callahan)

Image
 जॉन कॅलाहान हा अमेरिकेतला (पोर्टलंड) एक प्रसिद्ध कार्टूनिस्ट. अगदी लहान वयातच दत्तक घेतला गेलेला, त्याबद्दल कल्पना असलेला, दत्तक आई-वडिलांनी सर्व कर्तव्य निभावून मोठा केलेला, घरात लहान भावंडं असलेला. तरूण वयात त्याला दारूचं भयंकर व्यसन लागलं. त्यापायी २१व्या वर्षी एका भीषण अपघातातून तो मरता मरता वाचला. पण कमरेपासून खाली पूर्ण अपंग झाला. अपघाताच्या वेळी तो इतका नशेत होता की अपघाताची त्याच्या मनात कोणतीही स्मृती नव्हती. त्यानंतरचे उपचार, रिहॅबिलिटेशन, तरीही पुढची ७-८ वर्षं दारूचं अतोनात व्यसन सुरूच राहणे, मग एक दिवस अचानक साक्षात्कार झाल्यासारखं अल्कॉहॉलिक्स अ‍ॅनॉनिमसला फोन, व्यसन सोडण्याचे प्रयत्न, त्यातून आपल्या हातात चित्र काढायची कला असल्याची जाणीव, आणि मग झपाटल्यासारखी कार्टून्स काढून ती विविध पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित करणे .... हा सगळा प्रवास त्याने स्वतःच्या शब्दांत लिहिला आहे. इतका ड्रामा असूनही अगदी प्रांजळ निवेदन, हलकीफुलकी सोपी भाषा, खुसखुशीतपणा यामुळे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी पटापट वाचून झालं. व्हीलचेअरवरचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, रोजची दैनंदिन कर्मं

पुस्तक परिचय : Amul's India

Image
 Amul's India: Based on 50 Years of Amul Advertising by daCunha Communications नाव वाचूनच हे पुस्तक वाचावंसं वाटलं. अमूलच्या जाहिरातींचा प्रवास, त्यामागचा विचार, असं सगळं कुणीतरी आतल्या माणसाने लिहिलेलं वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण हा लेखसंग्रह निघाला. तरी म्हटलं हरकत नाही, कारण विषयात इंटरेस्ट होताच. अनुक्रमणिकेत चांगली चांगली नावं दिसली. पण एकूणात हे कॉफी टेबल बुक आहे. दाकुन्हा मंडळींनीही त्यात लिहिलं आहे, पण ते फार काही इनसाईट प्रकारचं नाही. अमूलच्या बर् ‍ याच जुन्या जुन्या जाहिराती पुस्तकात आहेत. त्या बघायला मजा येते. त्यातल्या काही पाहिल्याच्या आठवत होत्या. पण त्यामुळेच हे पुस्तक किंडल रीडरच्या काळ्या-पांढर् ‍ या स्क्रीनवर वाचण्यात मजा नाही हे पण लक्षात आलं. मग मी जिथे जिथे त्या जाहिराती आल्या तिथे फोन अ ‍ ॅपमध्ये त्या रंगीत स्क्रीनवर पाहिल्या. कोणतंही पान उघडायचं, जरा चाळायचं इतपतच कंटेंट आहे पुस्तकाचा. तसंच अभिप्रेत असावं त्यांना, माझ्याच फार अपेक्षा होत्या.