पुस्तक परिचय : Amul's India
Amul's India: Based on 50 Years of Amul Advertising by daCunha Communications

नाव वाचूनच हे पुस्तक वाचावंसं वाटलं. अमूलच्या जाहिरातींचा प्रवास, त्यामागचा विचार, असं सगळं कुणीतरी आतल्या माणसाने लिहिलेलं वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती.
पण हा लेखसंग्रह निघाला. तरी म्हटलं हरकत नाही, कारण विषयात इंटरेस्ट होताच. अनुक्रमणिकेत चांगली चांगली नावं दिसली. पण एकूणात हे कॉफी टेबल बुक आहे. दाकुन्हा मंडळींनीही त्यात लिहिलं आहे, पण ते फार काही इनसाईट प्रकारचं नाही.
अमूलच्या बर्याच जुन्या जुन्या जाहिराती पुस्तकात आहेत. त्या बघायला मजा येते. त्यातल्या काही पाहिल्याच्या आठवत होत्या. पण त्यामुळेच हे पुस्तक किंडल रीडरच्या काळ्या-पांढर्या स्क्रीनवर वाचण्यात मजा नाही हे पण लक्षात आलं.
मग मी जिथे जिथे त्या जाहिराती आल्या तिथे फोन अॅपमध्ये त्या रंगीत स्क्रीनवर पाहिल्या.
कोणतंही पान उघडायचं, जरा चाळायचं इतपतच कंटेंट आहे पुस्तकाचा. तसंच अभिप्रेत असावं त्यांना, माझ्याच फार अपेक्षा होत्या. 

Comments