Posts

Showing posts from October, 2020

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ४)

Image
आमच्या महिन्याभराच्या भटकंतीचा शेवटचा दिवस. डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉर (Helsingør) इथला ‘क्रॉनबोर्ग कॅसल’ पाहायला निघालो होतो. रेनेसाँ काळातला उत्तर युरोपमधला हा एक महत्त्वाचा किल्ला. कोपनहेगन ते हेलसिंगॉर हा पाऊण तासाचा ट्रेन प्रवास, किल्ल्याचं स्थापत्य, थोडाफार इतिहास आणि किल्ल्यालगतची खाडी- त्या दिवसाच्या भटकंतीची इतकी पूंजी देखील भरपूर ठरली असती; स्वच्छ हवा, अहाहा गारवा, शांत वातावरण ही नेहमीची यशस्वी मंडळी जोडीला होतीच; मात्र आमच्या पर्यटकी ललाटावर त्याहून अधिक काही लिहिलेलं होतं आणि किल्ल्यात आतवर जाईपर्यंत त्याची आम्हाला कल्पना नव्हती. ठरलेली ट्रेन पकडून हेलसिंगॉरला पोहोचलो. स्टेशनवरून चालत, रस्ता शोधत शोधत कॅसल गाठला. तिकीट काढून आत शिरलो. तिथे येणार्‍या सर्वांनाच किल्ल्यात सहज मार्ग शोधत फिरता यावं अशी व्यवस्था होतीच. शिवाय तिकिटासोबत एक माहितीपत्रक आणि नकाशाही मिळालेला होता. माहितीपत्रकात लिहिल्यानुसार, क्रॉनबोर्ग किल्ल्याचा अभिजात इंग्रजी साहित्याशीही घनिष्ट संबंध आहे; कारण शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचं कथानक याच किल्ल्यात घडताना दाखवलं आहे. (नाटकात हॅम्लेट

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ३)

Image
आमचा प्रवास सुरू होऊन १५-२० दिवस झाले होते. मध्य-पूर्व डेन्मार्क, नॉर्वे, दक्षिण स्वीडन इथली भटकंती संपवून आम्ही आता इस्टोनियाची राजधानी टालिन (Tallinn) इथे आलो होतो. टालिन आमच्या मूळ ट्रॅव्हल प्लॅनमध्ये नव्हतंच. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे चार(च) देश फिरायचं; नॉर्वे, स्वीडन, फिनलंडमध्ये प्रत्येकी एका आर्क्टिक सिटीत तरी किमान जायचं; असं आधी ठरवलं होतं. कारण होतं थंडी + midnight sun हे कॉम्बिनेशन! त्याप्रमाणे ट्रॉम्सो (नॉर्वे) आणि रोवानिएमी (फिनलंड) इथला प्लॅन एकूण प्लॅनमध्ये फिट बसला. स्वीडनमध्ये किरुना किंवा अ‍ॅबिस्को ही दोन ठिकाणं शॉर्टलिस्ट केली होती. पण तिथे थेट विमान किंवा ट्रेन अप्रोच नव्हता. बस प्रवासच करावा लागणार होता. आम्हाला दोघांनाही मोशन-सिकनेसचा खूप त्रास होतो, त्यामुळे बसप्रवासावर आमची फुली असते. बसप्रवास टाळून किरुना किंवा अ‍ॅबिस्कोला कसं जाता येईल यावर आम्ही बराच काथ्याकूट केला. (सहा महिने आधी प्लॅनिंग केल्याचा हा फायदा होता. हाताशी भरपूर वेळ होता.) पण तसं काहीही शक्य नव्हतं. मुळात त्या देशांमध्ये बाल्टिक समुद्राच्या आसपास एकवटलेल्या शहरा-गावांव्

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग २)

Image
ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट. ऑस्लो, नॉर्वेची राजधानी. तिथल्या प्रसिद्ध फ्रॉग्नर पार्कमधली ‘विजेलँड इन्स्टॉलेशन्स’ बघायची होती. गुस्ताव विजेलँड हा २०व्या शतकातला नॉर्वेतला नावाजलेला शिल्पकार. त्याने २० वर्षं खपून फ्रॉग्नर पार्कमध्ये ब्राँझ आणि ग्रॅनाइटचे जवळपास दोनशेहून अधिक मानवी पुतळे उभे केले. खुल्या जागेतला हा पुतळ्यांचा संग्रह इथे पाहता येतो. -- एक-एक शिल्प पाहत पाहत आपण पुढे जात राहतो; शेवटी एक उंचच उंच अजस्त्र खांब आहे- ‘मोनोलिथ’; त्या एका खांबावर शंभर-सव्वाशे मनुष्याकृतींची शिल्पं आहेत. एकूणच हा संग्रह सुरुवातीपासूनच नजरेचा ठाव घेणारा आहे. (त्याबद्दलही सविस्तर लिहायचं मनात आहे.) सुरूवातीचे एक-दोन पुतळे पाहून होत नाहीत तोच कानावर एक ओळखीची लकेर आली- राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’मधली अ‍ॅकॉर्डियनवरची एक धून. त्या आवाजाच्या दिशेला पाहिलं तर एका कोपर्‍यात एक मध्यमवयीन मनुष्य लहानशा खुर्चीवर बसून खरंच अ‍ॅकॉर्डियन वाजवत होता. आम्ही ती धून ऐकून थबकलोय हे त्याच्या लक्षात आलं होतं. तो आमच्याकडे पाहून जरासा हसला आणि

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १)

Image
आमच्या उत्तर युरोप भटकंतीची ती सुरुवात होती. भोज्जे पर्यटन करायचं नाही, प्रत्येक ठिकाण जाऊन पाहण्याचा अट्टहास करायचा नाही, निवांत मनाला वाटेल तसं फिरायचं, इतकंच ठरवून निघालो होतो. पहिला मुक्काम डेन्मार्कमधल्या ओडेन्स इथे होता. पहिल्याच दिवशी जुन्या ओडेन्स शहरात अक्षरशः वाट फुटेल तसे चाललो, फिरलो. जुन्या काळातली सुंदर लाकडी घरं, छोट्या शांत गल्ल्या, फरसबंदी रस्ते, पर्यटकांची तुरळक गर्दी... ओडेन्स हे हान्स क्रिसचियन अँडरसनचं जन्मगाव. अठराव्या शतकातलं त्याचं घर बाहेरून पाहिलं; आता तिथे एक म्युझियम आहे. एक-दोन ठिकाणी रस्त्यांमध्ये त्याच्या कथांमधल्या पात्रांचे पुतळे उभे केलेले दिसले. लहानपणी वाचलेल्या त्याच्या परिकथा अंधुक आठवत होत्या. त्यामुळे त्या पुतळ्यांचा संदर्भ तिथल्या तिथे लक्षात आला नाही; तरी ती कल्पना आवडलीच. दिवसभराच्या पायपिटीनंतर घरी परतत होतो. ओडेन्स रेल्वे स्टेशनसमोरच ‘किंग्ज गार्डन’ ही एक मोठी बाग आहे. मुख्य रस्त्यालगतच ते छान, हिरवगार मोकळं मैदान दिसलं; मनात आलं, तिथे जाऊन बसलो. उत्तर युरोपमधला उन्हाळ्यातला लांबलेला दिवस, हवेतला ‘अहाहा’ गारवा, शांत वाताव