Posts

Showing posts from January, 2013

तंत्रज्ञान? नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पाऊले!

नुकतीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठ्या आणि प्रसिध्द दुकानात गेले होते. निमित्त होते तिथूनच काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या पेन-ड्राईव्हने अचानक संप पुकारण्याचे. तो पेन-ड्राईव्ह घेतला तेव्हा एकतर मला दुकानात शिरल्या शिरल्या कॅश-काऊण्टरजवळच मिळाला होता. शिवाय त्यादिवशी मी जरा घाईतही होते; अवघ्या पाच-दहा मिनिटांत ती खरेदी उरकून बाहेर पडले होते. थोडक्यात, तेव्हा त्या दुकानात मला नीटसा फेरफटका मारता आलेला नव्हता. पण मग माझ्या दुसर्‍या फेरीच्या वेळी मात्र मी ती कसर भरून काढली. तसेही, दुकानातल्या तथाकथित ‘सेल्स-एक्झिक्युटीव’नामक मनुष्यविशेषाने मला त्या पेन-ड्राईव्हची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कार्यालयात जाण्याचा मौलिक सल्ला देऊन दोन मिनिटांत वाटेला लावलेच होते. माझ्या फेरफटक्याची सुरूवात अर्थातच स्वयंपाकघरात वापरात येणार्‍या वस्तूंच्या विभागापासून झाली. वॉटर-प्युरिफायर्स्‌, मायक्रोवेव्ह ओव्हन्स्‌, मिक्सर-ग्राइण्डर्स्‌, सॅण्डविच-टोस्टर्स्‌, रेफ्रिजरेटर्स्‌ ही सर्व मंडळी आपल्याला ऐकून-पाहून-वापरून बर्‍याच वर्षांपासूनची तशी चांगली परिचित असलेली. पण त्यातही असलेली विविधता, तंत्रज्ञान

पुस्तक परिचय - ’पंखाविना भरारी’

व्हीलचेअरवर बसलेले एखादे अपंग मूल आणि सोबत त्याचे पालक असे दृष्य सार्वजनिक ठिकाणी कधी दिसले, तर आपण काय करतो? तर, त्या मुलाचे अपंगत्त्व नक्की कशा प्रकारचे आहे त्याच्या तपशीलात शिरण्याच्या फंदात न पडता आधी नुसते हळहळतो, मग जे ‘त्यांच्या’ नशीबी आले ते आपल्याला भोगावे लागत नसल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानतो आणि पुढे चालायला लागतो. बस्स! काही वर्षांपूर्वी प्रसाद घाडी या शाळकरी वयाच्या मुलाला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात गाताना जेव्हा मी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथम पाहिले, तेव्हाही त्याच्या व्हीलचेअरकडे पाहून मनोमन चुकचुकणे हीच माझी प्रमुख प्रतिक्रिया होती. पुढे काही दिवस त्याचा प्रसन्न चेहरा, खड्या आवाजातले गाणे आठवत राहिले; नंतर ते ही विसरायला झाले. ‘पंखाविना भरारी’ हे शरयू घाडी यांनी लिहिलेले पुस्तक हातात आल्यावरही ‘हाच तो, त्या कार्यक्रमात व्हिलचेअरवर बसून गायलेला मुलगा’ हेच आधी डोक्यात आले. त्याचे व्हिलचेअरवरचे जखडले जाणे हे असे नकळत मनात रुतून बसलेले होते. व्हिलचेअरवर बसून घराबाहेर जाणे तर दूरच, मुळात अंथरुणातून उठून, खरेतर कुणीतरी दुसर्‍याने उठवून व्हिलचेअरवर बसते करणे, हाच