Posts

Showing posts from December, 2019

पुस्तक परिचय : लीळा पुस्तकांच्या (लेखक : नीतीन रिंढे)

Image
पुस्तकांच्या दुकानात जायचं, बराच वेळ निवांत पुस्तकं चाळायची, नवनवीन लेखक, पुस्तकं माहित करून घ्यायची, हा माझा एक लाडका विरंगुळा. अशा प्रत्येक वेळी पुस्तकखरेदी होतेच असं नाही; किंवा पुस्तकखरेदी करायची असेल तेव्हाच पुस्तकांच्या दुकानात जावं, अन्यथा नाही, असंही मला वाटत नाही. नुकतंच ‘लीळा पुस्तकांच्या’ (लेखक नीतीन रिंढे) हे ’ books on books’ प्रकारातलं पुस्तक वा चलं, तेव्हा असाच पुस्तकांच्या दुकानात रमल्याचा feel आला. वास्तविक हे पुस्तक म्हणजे a book on books on books असं म्हणायला हवं. पुस्तकं, त्यांची मुखपृष्ठं, पुस्तकवेडे, पुस्तकं जमवणं, त्यासाठीचा आटापिटा, ती नीट सांभाळण्यासाठीची खटपट, मोठाले पुस्तकसंग्रह, पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली पुस्तकं, पुस्तकांची दुकानं, bookshelves, अशा ’पुस्तक’ या संज्ञेला लगडून येणार्‍या सर्व विषयांवरच्या विविध इंग्रजी पुस्तकांविषयी या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘Books on books’ या पुस्तकप्रकाराला कसं भिडावं हे मला खूप काही सरावाचं नव्हतं. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं तर या पुस्तकात गुंतायला मला जरा वेळच लागला. मुळात (नेहमीप्रमाणे)