Posts

Showing posts from August, 2011

पुस्तक परिचय - 'हेडहंटर'

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख  इथे  (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ---------------------------------- ‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात. आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य अशी माणसे