Posts

Showing posts from 2011

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’
दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झपाटल्यावर योजनेची आखणी,…

पुस्तक परिचय - 'हेडहंटर'

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ---------------------------------- ‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात.
आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य अशी माणसे शोधू…

हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन !!

‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं.
काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं.
ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्‍या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभागी …

घरोघरी मातीच्या चुली - २

घरोघरी मातीच्या चुली - १

----------


"अहो, काय हे...!"
".........."
"तुम्हाला करण्यासारखं दुसरं काही नव्हतं काऽऽ?"
"(काहीच न कळून) नाही ना! हातातलं लेटेस्ट प्रोजेक्ट संपलंय. आणि आता मी काही पूर्वीसारखा बिझी राहिलेलो नाही या प्रोजेक्टवरून लगेच पुढच्या प्रोजेक्टवर उडी मारायला..."
"(हात झटकत) तुमच्या प्रोजेक्टची कौतुकं मला नका सांगू! पूर्वपुण्याईवर अजूनही लोकं तुम्हाला बोलावतायत. नाहीतर काही खरं नव्हतं."
"ते काही का असेना! पण आपला एकुलता एक मुलगा अजूनही स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडतोय. तोपर्यंत एक बाप म्हणून आर्थिक भार उचलणं माझं कर्तव्य नाहीये का?"
"कोण म्हणेल तो अजून स्थिरस्थावर झालेला नाहीये?"
"का? मीच म्हणतोय! तुझ्यामाझ्यात काय लपवालपवी करायची? अभिषेक अजूनही हातपायच मारतोय हे सत्य नाहीये का?"
"हातपायच मारत असता, तर हे... हे शक्य झालं असतं का?"
"काऽऽय शक्य झालं असतं का?"
"(हातातला पेपर नाचवत) हेच... आज सकाळी जे मी वाचलंय ते..."
"(समजुतीच्या सुरात) या वयात असा त्रागा बरा नव्ह…

गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.

Image
आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असणं…

एका वाक्यातलं आर्ट ऑफ लिव्हिंग

शाळेत असताना ‘सुविचार’ हा एक छळवाद मागे लागलेला असायचा. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच्या सूचनाफलकावर आणि नंतर वर्गातल्या फळ्यावर रोज एक नवा सुविचार लिहिण्याचं काम आळीपाळीने करावं लागायचं. सहावी-सातवीत असेपर्यंत त्या सुविचारांचा पुरवठा न चुकता मराठीच्या बाईंकडून व्हायचा. आठवीपासून ती ही अतिरिक्त जबाबदारी अंगावर येऊन पडली. बर्‍याच वेळेला असंही व्हायचं की जी वाक्यं आम्ही ‘सुविचार!’ म्हणून निवडायचो ती बाईंच्या मते अगदीच साधी ठरायची. पुन्हा, ‘अति तिथे माती’सारखी घासून गुळगुळीत झालेली वाक्यं लिहायची म्हणजे शान के खिलाफ! त्यातूनच कधीतरी सुविचाराच्या जागी एखादं संस्कृत सुभाषितही चालतं हे कळलं. कळल्यावर बर्‍यापैकी हायसं वाटल्याचं मला अजूनही आठवतंय. मग, वर्गात सर्वांसमक्ष ज्यांचा अर्थ सांगणं त्यातल्या त्यात सोपं जाईल अशी सुभाषितं संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातून शोधून आम्ही फळ्यावर लिहायचो.
सुविचारांचा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीनं मराठी (आणि काही अंशी संस्कृत) त्यातल्या त्यात बरं पडायचं. इंग्रजीची मात्र त्या आघाडीवर जरा कठीणच अवस्था होती. काहीकाही इंग्रजी सुविचार तर एखाद्या अत्यंत अवघड कोड्याप्रमाणे व…

पुस्तक परिचय : 'द फर्म'

रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी यांच्यासमो…

पुस्तक परिचय - आवा

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
(मूळ लेख इथे वाचता येईल.)

------------------------------------------

चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी.
आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी.
नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुटुंबासाठीच्य…

आर.टी.ओ.च्या नानाची... !!!

माझा दुचाकीचा लायसन्स मागच्या महिन्यात संपुष्टात आला. आता याला माझा वेंधळेपणा म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा पण हे माझ्या लक्षात आलं ते लायसन्सनं ‘राम’ म्हटल्यानंतरच. यातला वेंधळेपणा हा की नूतनीकरणाची कुणकुण मला आधीचे २-३ महिने लागलेली होती आणि तरीही मी लक्षात ठेवून वेळेवर ते काम केलं नाही; दुर्दैव आणि योगायोग असे की आदल्या महिन्याच्या ज्या तारखेला लायसन्सनं शेवटचा श्वास घेतला होता, चालू महिन्याच्या नेमक्या त्याच तारखेला नूतनीकरण नक्की कधी आहे हे पाहण्याच्या उद्दीष्टानं मी अगदी कॅलेंडर बघून दिवस ठरवल्यासारखा तो उघडून पाहिला.
एक महिन्यापूर्वीच आपला लायसन्स होत्याचा नव्हता झालाय हे लक्षात आल्यावर माझा चेहराही क्षणार्धात तसाच म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखा झाला. (या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)
गेला महिनाभर आपण गावभर चक्क विनापरवाना गाडी चालवत होतो हे जाणवलं. तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिलेल…