Posts

Showing posts from December, 2020

पुस्तक परिचय - Hired: Six Months Undercover in Low-Wage Britain (James Bloodworth)

Image
जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्‍यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्‍या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे. अमॅझॉन पिकिंग ॲन्ड पॅकिंग वेअरहाऊस (Rugeley), केअर वर्कर (Blackpool), एका इन्शुरन्स कंपनीचं कॉल सेंटर (South Wales), उबरचालक (लंडन) अशा चार नोकर्‍या त्याने केल्या. पुस्तक लिहिण्याचं ठरवूनच त्यानं हे प्रोजेक्ट सुरू केलं. मात्र प्रस्तावनेत तो म्हणतो, की तो केवळ तुटपुंज्या पगारांच्या नोकर्‍या यापुरतं पुस्तक मर्यादित ठेवू शकला नाही. त्या नोकर्‍यांइतकंच त्या-त्या गावांबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, पूर्वी त्या ठिकाणी भरभराटीला आलेले जुने पारंपरिक उद्योगधंदे, ते लयाला गेल्यानंतर