Posts

Showing posts from April, 2018

न्यूझीलंड:१ - माओरी! माओरी!!

Image
माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते. न्यूझीलंडला जायचं ठरवलं, ते स्वतःच सगळं प्लॅनिंग करायचं, असं योजूनच. त्याप्रमाणे व्हीजासकट सगळी पूर्वतयारी केली. बुकिंग्ज झाली. न्यूझीलंडचा नकाशा धुंडाळताना बर्‍याच ठिकाणांची अ-इंग्रजी वाटणारी नावं दिसत होती- व्हांगारेई, वायटोमो, लेक वाकाटिपु, वगैरे. ती बहुदा माओरी भाषेतली असावीत अशी मनोमन नोंद झाली; पण त्यावर अधिक विचार केला गेला नाही. तयारीच्या तीन-चार महिन्यांदरम्यान इंटरनेटवरचे विविध फोरम्स, हाती लागतील ते ब्लॉग्ज, व्लॉग्ज, इतर माहिती धुंडाळणे, त्या देशाबद्दलची स्वतःच्या परिने एक पूर्वपीठिका तयार करणे, हे सुरू होतंच. स्वबळावर निवडणूक लढवतात तसं प्रथमच स्वबळावर परदेशी