Posts

Showing posts with the label व्यक्तिमत्त्व

प्रागची जादू, स्ट्रीट म्युझिक वगैरे

Image
 प्रागमधला तिसरा दिवस. सकाळपासून म्हटलं तर randomly भटकत होतो. Letna Park च्या टेकडीवरून खाली उतरलो, समोर आलेला नदीपूल पार केला आणि Old Town Square ची दिशा धरली. या चौकाला ५००-६०० वर्षांचा इतिहास आहे. त्या काळाच्या मानानं हा चौक GRAND आहे. चौकाच्या भोवती अनेक बारीकसारीक रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या आहेत. अशाच एका उपरस्त्यावरून आम्ही चौकाच्या तोंडाशी पोचलो. भरपूर गर्दी, वर्दळ, गजबज होती. अचानक उजव्या हाताला रस्त्याच्या कडेला एक वादक वाटणारा माणूस दिसला. Folding खुर्चीवर बसला होता. थकलेला चेहरा, पिकलेले केस, धीमेपणानं पुढ्यातल्या उलट्या टोपीतली नाणी गोळा करत होता. माझी नजर आपसूक शेजारच्या वाद्यांवर गेली. दोन saxophones होते. मी जरा वेळ रेंगाळले. पण म्हातारबाबांचा lunchtime झाला होता बहुतेक. ते काही वादन पुन्हा सुरू करेनात. आधी जरा हळहळायला झालं. पण street music म्हटलं की हे देखील आलंच. वाद्यांच्या लकेरी अचानक कानावर पडण्यातली मजा जशी आहे, तशीच ही हळहळ. आम्ही पुढे सरकलो. पुढचा तासभर तो grand चौक बघण्यात कसा गेला कळलं नाही. २ वाजून गेले होते. आता गारठा चांगलाच वाढला होता. आलो त्याच्या विरु...

पुस्तक परिचय : Em and The Big Hoom (Jerry Pinto)

Image
Lockdown book #2 जेरी पिंटो हे पत्रकार म्हणून ठाऊक होते, पण त्यांनी कादंबरीलेखनही केलंय हे किंडलमुळे समजलं. 'एम अँड द बिग हूम' ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या मनोविकारग्रस्त आईची कथा आहे. त्यांच्या आईच्या या विकारांचा स्पॅन खूप मोठा होता. विनाकारण बडबड, फकाफका बिड्या पिणं, गोड खाण्याला धरबंध नसणं (एका चहाच्या कपात ६-७ चमचे साखर) ते नर्वस ब्रेकडाऊन, हॅलुसिनेशन्स, डिप्रेशन अटॅक्स, घरातच आत्महत्येचे अनेकवेळा प्रयत्न, त्यातले काही गंभीर - इथपर्यंत सर्व प्रकारांना त्या कुटुंबाने तोंड दिलं. जेरी पिंटो आणि त्यांची सख्खी मोठी बहीण दोघांनी आपल्या आईशी मारलेल्या गप्पांमधून प्रामुख्याने सर्व कथा समोर येते. त्यांची आई गप्पीष्ट होती, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची होती, सेक्ससारख्या अवघड विषयांवरही ती आपल्या मुलांशी खुला संवाद साधायची. त्यांच्या गप्पा आणि लेखकाचं प्रथमपुरूषी निवेदन - या सगळ्यावर आईच्या विकारांचं मळभ आहे, तरी भाषा खुसखुशीत आहे. Add caption Em - म्हणजे मुलांनी आपल्या आईचं ठेवलेलं लाडकं नाव. पुस्तकात आईचं नाव 'इमेल्डा' आहे. बोलता बोलता आई...

वर्णद्वेष कोळून प्यायलेलं बालपण (पुस्तक परिचय : बॉर्न अ क्राइम, लेखक : ट्रेवर नोआ)

Image
ढोबळमानाने आपल्यासाठी दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष गांधीजींना ट्रेनमधून ढकलून देण्यापासून सुरू होतो आणि नेल्सन मंडेलांच्या सुटकेपाशी संपतो. मंडेला सुटले, त्या देशात लोकशाही सरकार आलं, द.आफ्रिकेची क्रिकेट टीम कलकत्त्यात वन-डे खेळली, इथले क्रिकेट-प्रेमी द.आफ्रिकेच्या खेळाडूंचे फॅन झाले... बस्स! आणखी काय हवं होतं! या सोयिस्कर समजुतीला अगदी सहज जाताजाता, गमतीजमतीत गप्पा मारतामारता जोरदार धक्का देतं Born a Crime : Stories from a South African childhood हे पुस्तक आणि त्याचा लेखक ट्रेवर नोआ. द.आफ्रिकेतल्या वर्णद्वेषावर लोकशाहीनं विजय मिळवलेल्या क्रांतीला ‘ब्लडलेस रेव्हल्युशन’ असं म्हटलं जातं. ट्रेवर नोआ लिहितो- It is called that because very little white blood was spilled. Black blood ran in the streets... पहिल्या काही पानांमध्ये लहान मुलाच्या खोड्या, त्याची हैराण झालेली आई, मायलेकाची झकाझकी असं चित्र उभं करणारं हे पुस्तक कधी या chilling statement पाशी येऊन पोहोचतं कळतच नाही. पहिली काही पानंच वाचून झालेली असतात आणि आपल्याला प्रथमच जाणवतं, की हलक्याफुलक्या भाषेत, खुसखुशीत पद्ध...

मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!

ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई , हे घरी बनवलंय ? मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो !! ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते!! मी : 😐😐 * ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई , माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक , मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲 * ती : ताई , लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं , उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो , मस्त असतोय , तो का नाही आणत ? मी : 😒😒 * ती : ताई , हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का ? ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑 * ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई , बारहून हा डबा स्वस्त पडतो ? मी : काय माहित! डबा नाहीतर बार , दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का ?? डी-मार्टातून नाही आणत ?? मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना ? ती : 🙆🙆 ...

फॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर

कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक! आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं... पुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं! दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं? कथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय, चांगली स्थळं येतच नाहीयेत या विचारानं तो हतबलही झालेला आहे. ओळखीपाळखी...

इयत्ता दहावी पास

एप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली , तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘ स्नेक-२ ’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता! त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून , दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गे...