Posts

Showing posts from February, 2009

मतदान आणि आनंदाश्रू

मी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी. मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे! का? तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून! यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस? बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा! अरे, काय हे! इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र! बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं? तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना? अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील! आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात! मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे? पोहत की उडत? कॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, "चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा दिसतो ते बघून येऊ"! हा सम्या सुद्

सुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे

मी सुजाता काटकर। इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे। तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं. गेला आठवडाभर त्या बराक ओबामाच्या शपथविधीनं आणि निबंधानं डोकं पकवलं. वीस लाख लोक जमले होते म्हणे त्या शपथविधीच्या जागी! दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही!) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच! (मुंबईवर अतिरे