Posts

Showing posts from March, 2009

चार पायऱ्यांचा पर्वत

पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला...
"हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला.
'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली.
तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं.
"सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली.
"रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे...
नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते. तिन…

डॅनी बॉयलचं जगप्रसिध्द त्रिकूट...!

झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत हे तीन शब्द कधी कुणी एकत्र म्हटले असते का? पण डॅनी अंकलनी ते तसे म्हटले। या तीन गोष्टींचा आपापसांत संबंध जोडायचाच झाला तर असा जोडावा लागेल की झोपडपट्टीच्या आसपास कुत्री असतात आणि गर्भश्रीमंतांकडेही (षौक म्हणून) कुत्री असतात। आता, ‘अ’ चा ‘ब’ शी संबंध असेल आणि ‘ब’ चा ‘क’ शी असेल तर ‘अ’ चा ‘क’ शी ही संबंध असतो असा बीजगणिताचा नियम आहे. आधीच गणित आणि त्यात वर बीजगणित - मग त्या नियमाला कोण आव्हान देणार? त्यापेक्षा तो नियम मुकाटपणे पाळलेला बरा. त्यामुळे ‘झो’, ‘कु’ आणि ‘ग’ यांना अ, ब, क च्या जागी (मुकाटपणे) substitute करून (substitution शिवाय बीजगणित म्हणजे भांडणांविना संसार, निवडणुकांविना भारत देश, आरत्यांविना गणेशोत्सव आणि कुत्र्यांविना - पुन्हा कुत्री! - दत्ताची तसबीर) - तर तसं substitute करून हे सिध्द होतं की झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत यांचा आपापसांत (बीजगणिती) घनिष्ठ संबंध आहे.
बीजगणिताच्याच अजून एका नियमानुसार कधी कधी अ, ब, क च्या जागी ३-३ गोष्टींचे अनेक गट चपखल बसू शकतात। उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्स, बर्गर आणि राजकीय पक्ष। मॅकडॉनल्ड्सचा बर्गर जगप्रसि…

कोण ही ’टवळी’... ??

(या लेखात कुठलेही राजकीय भाष्य करण्याचा हेतू नाही। तसंच कुठल्याही (एकाच) राजकीय मतप्रवाहाला पाठिंबा देण्याचाही हेतू नाही. आमच्याच नात्यात माझ्या जन्मापूर्वी घडलेला (मी माझ्या आजीकडून ऐकलेला) हा एक प्रसंग आहे. तो सर्वांना सांगावासा वाटला इतकंच. काळ-वेळाचे संदर्भ थोडे पुढे-मागे झाले असल्यास कृपया वाचकांनी सांभाळून घ्यावे ही विनंती.)

तो १९५० किंवा फार फार तर १९६० च्या दशकाचा काळ असावा। स्वातंत्र्यानंतरचा सुवर्णकाळ म्हणून हा काळ ओळखला जातो। पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांची भाषणं, देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय दौरे यांना जोरदार प्रसिध्दी मिळत असे. देशातल्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांतून झळकणारी त्यांची छबी ही तेव्हा अनेकांना आश्वासक, स्वतंत्र भारताच्या भरारीच्या स्वप्नांची मूर्तरूप वाटत असणार.पण एका विशिष्ट राजकीय मतप्रवाहाची मंडळी मात्र आतून अजूनही धुमसत होती. स्वातंत्र्य तर मिळालं होतं पण त्याच्यासोबत समाधान होतंच असं खात्रीशीर सांगता येत नव्हतं; कुठेतरी, काहीतरी चुकतंय अशी भावना होती. स्वातंत्र्य मिळलं तरी ते ज्या पध्दतीनं मिळलं, त्यासाठी जी ’किंमत’ मोजावी ला…