Posts

Showing posts from March, 2008

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये. ( यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही .) ’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो. ’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला. ’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला. ’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली. ’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले. ’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते! ’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला. ’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले. ’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली. ’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले. ’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले. ’ढ’ :