कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये. (यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)
’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो.
’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला.
’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला.
’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली.
’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले.
’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते!
’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला.
’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले.
’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली.
’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले.
’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले.
’ढ’ : ढालगज ढमी ढमढेरेने ढीगभर ढेपा ढकलल्या.
’त’ : तापट तुषार तुंगारेने तिरसट तुकारामचा तपकिरी तबला तोडला.
’थ’ : थायलंडचा थोराड थिमय्या थंडीने थोडासा थिजला.
’द’ : दमणच्या देशी दारूच्या दुकानातला दीड दमडीचा दत्तू दामले दम्याने दहा दिवसांतच द्रविडच्या दारात दगावला.
’ध’ : धारवाडच्या धीरगंभीर धीरजने धाकट्या धन्याला धुरकट धुपाटण्याने धू-धू धुतले.
’न’ : नाहीतरी नागपूरच्या नाटकी नेमाड्यांच्या नखरेल नमीचे नाक नकटेच!
’प’ : पुण्याच्या पाजी पोतनिसांचा पुचाट पुष्कर पिताजींना पाणी पाजून पालखीतून पट्कन पोलंडला पळाला.
’फ’ : फिकट फातरफेकरांच्या फेंगड्या फातिमाने फुकटचे फारच फुगे फोडले.
’ब’ : बनेश्वरच्या बेरकी बाबा बर्व्यांच्या बाहेरच्या बागेतल्या बाकावर बसलेल्या बिनडोक बनीच्या बावळट बोक्याला बंगलोरच्या बुळ्या बबनने बोगद्यात बबितासमोर बदड-बदड बदडले.
’भ’ : भोचक भडकमकरांचा भेकड भीम भूतानमध्ये भुतासारखा भटकतो.
’म’ : मानखुर्दच्या मेंगळट मिलींदने मराठीत मात्र मस्त मार्क मिळवले.
’य’ : यवतमाळची यमी येवलेकर यंदा यानातून यात्रेला येणार.
’र’ : राकट राशिंगकरांचा रोड रमेश रात्री राजरोसपणे रस्त्यावर रेंगाळतो.
’ल’ : लुकड्या लता लुकतुकेने लबाड लालाजीला लीलया लोळवले.
’व’ : वाशीचा विचित्र वसंत विचारे वेड्या वामनवर वैतागला व वाल वेचायला विसरला.
वाशीचा विचित्र वसंत विचारे वेड्या वामनच्या वस्तू वरचेवर वापरतो.
’श’ : शांत शंतनू शेक्सपिअरच्या शानदार शाळेत शंभरदा शिंकला.
’स’ : सांगलीचा सदू सुतार सिमल्यात सोकावलेल्या संजयच्या सापळ्यात सापडला.
’ह’ : हरघडी हरवणऱ्या हेकट हजामाला हुशार हिरेमठने हौदातून हजारदा हाकलले.

Comments

Abhi said…
खूपच छान!!!

-अभी
रोहन... said…
रोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D

तेंव्हा अगदी पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग...!!!

ही वाक्ये मस्त आहेत. तुम्ही लिहिली आहेत ??? सही...!!!
॒ रोहन चौधरी.......

हो. ही सगळी वाक्यं मी आणि माझ्या बहिणीनं मिळून केली आहेत... फावल्या वेळेत. याचा ’भाग २’ पण आहे पुढे.
(इतक्या जुन्या पोस्टवर आलेला प्रतिसाद पाहून मला आधी खरंच आश्चर्य वाटलं होतं.)
Dk said…
ye to padha hi nahi tha :) sahiii aahes

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)