Posts

Showing posts with the label ललित

मोडलेली मनं, जोडणारे खेळ

Image
  ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’... सिरियाचे दोन जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे दोन ज्युडोपटू, इथियोपियाचा एक मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे पाच धावपटू... त्या दहाजणांचे स्वतःचे देश आता त्यांचे उरले नव्हते. त्यांचं निर्वासित असणं त्यांना इतरांहून वेगळं करणारं होतं. मात्र ते बोचरं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. ऑलिंपिक्स खेळांनी त्यांना तशी संधी दिली होती. एक नवा इतिहास घडत होता. त्याला कारणीभूत होती जगाची बसलेली एक नवी घडी... की विस्कटलेली? खेळ, शारिरीक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना करणं आपल्याला...

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

Image
  “Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.” – UNHCR, Policy on Refugee Children   "... तुर्कस्थानातून ग्रीसच्या किनार्‍यावर होड्या भरून आलेले निर्वासित... मोठी माणसं , लहान मुलं... सगळे असे कोर्‍या चेहर्‍याने इथे तिथे बसलेले... मला कळेना , यांच्यासमोर मी काय सादर करणार... तरी मी खिशातून नेहमीचे गंमतीदार मोठे दात काढले , ते माझ्या दातांवर बसवले आणि भुवया उडवून जरासा हसलो ; तर एका लहानगीचा चेहरा लगेच खुलला , तिने शेजारच्या मुलाला कोपराने जरासं ढोसून खुणेने सांगितलं , तो बघ , कोण आहे!” हे सांगणारा क्ले मेझिंग एक विदूषक आहे. आधुनिक जगात सर्कसच्या बाहेर विदूषक बघायला मिळणं तसं दुर्मिळच. आज मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे , पैसा नको आहे ; निर्वासित मुलांच्या चेहर्‍यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय...

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

Image
उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते. आता आणखी एक कल्पना करून बघा- एक सताड उघडी सूटकेस. आत दिसतंय बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं एक घर. घराचा दर्शनी भाग पुरता विस्कटलेला. भिंती मोडून पडलेल्या, आतल्या सळ्या अस्ताव्यस्त बाहेर आलेल्या. खोल्यांमधल्या वस्तू कालपर्यंत अगदी व्यवस्थित, नीटनेटक्या असाव्यात; आता त्या स्फोटामुळे धुरकट झालेल्या, अवकळा आलेल्या. अगदी आता-आतापर्यंत त्या खोल्यांमध्ये माणसांचा वावर असावा; पण आता ते घर उजाड, भकास, सुनसान झालंय. हिंसेचं असं उघडंवाघडं रूप पाहून ती सूटकेस पटकन बंद करून टाकाविशी वाटते. पण ते शक्य नाहीये. आणि ही एकच सूटकेस नाही, अशा ओळीने नऊ सूटकेसेस विध्वंस घेऊन समोर उभ्या ठाकल्या आहेत... हे आहे ‘अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज’, एक...

न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २) ---------- न्यूझीलंड टूरच्या आधीच्या आठवड्यात टीव्हीवर रॉस टेलरचे इंग्रजी उच्चार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता; तरी त्या देशात फिरताना खास क्रिकेट थीम मनात धरून फिरावं, बघावं असं काही निघताना डोक्यात नव्हतं. तिथे पहिल्याच दिवशी पाहियाच्या समुद्रकिनार्‍यावर (Horotutu Beach) भटकताना ही एक पाटी दिसली आणि तो धागा लक्षात आला. -- ज्ञात माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये १८३२ साली पहिला किकेट सामना खेळला गेला. सामन्याची जागा त्या पाटीच्या आसपास कुठेतरी असावी असं त्यात लिहिलेलं होतं. हा फोटो काढला तिथे आता व्यवस्थित डांबरी रस्ता आहे. समोर समुद्र. म्हणजे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला ते ठिकाण असावं असा आम्ही अंदाज बांधला. आता त्या बाजूला घरं, हॉटेलं वगैरे आहेत. पाहियात क्रिकेटचा उल्लेख अन्यत्र कुठे दिसला नाही. पुढे रोटोरुआतही तसंच. शिवाय...

न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) ---------- पाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच. वेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली. आमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की ...