Posts

Showing posts with the label लोकसत्ता - पुस्तक परिचय

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे  वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’ दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झ...

पुस्तक परिचय - 'हेडहंटर'

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख  इथे  (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ---------------------------------- ‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात. आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य ...

पुस्तक परिचय : 'द फर्म'

रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी ...

पुस्तक परिचय - आवा

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. (मूळ लेख इथे  वाचता येईल.) ------------------------------------------ चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी. आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी. नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुट...

पुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे  किंवा  इथे  (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल. ----------------------------------------- सशक्त माहितीपट स्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम स्थान मिळाले. पण त्याकाळच्या स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कधीही याची तमा बाळगली नाही. कधी स्थानिक पातळीवर तर कधी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडली. स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला. महात्मा गांधी, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी जी शिकवण दिली ती अंगिकारून आपापल्या परीने महान देशकार्य आणि समाजकार्य करणार्‍या अश्याच एकवीस अग्निशिखांचा परिचय लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या ‘कथा अग्निशिखांच्या’ या पुस्तकात करून दिला आहे. हे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी त्यामागे बरेच संशोधन दडले आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पुस्तक वाचताना एखादा सशक्‍त माहितीपट पाहत असल्य...