Posts

Showing posts from 2014

कविता गेली खड्ड्यात...!

मायबोली हितगुज दिवाळी अंक-२०१४ मधला लेख

---------------------------

अशी कशी ही माझी आई! अशी कशी ही माझी आई!
पहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते,
‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.
हे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,
भजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.
सारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,
स्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते!!
अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई!
कपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,
पेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते.
पाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते,
कंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते.
इतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते,
परतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते.
अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई!
माझं एकच ऐकशील का आई? नको म्हणूस, "होऊ कशी उतराई",
तुझ्यामुळे मी या जगात आले, आई!
तुझ्यामुळे मी या जगात आले, आई!
व्हॉट द फ... सॉरी! पण ही काय कविता आहे?? कविता अशी असते?? कुठल्याही मीटरमध्य…

तीन तिघाडा...

वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.
समोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का? किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का? पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते; …

जागरूक नागरिक ऊर्फ मोरू

Image
जागरूक नागरिक असणं म्हणजे स्वतःचा मोरू करून घेणं... गेला आठवडाभर सर्व वर्तमानपत्रांमधून ’जागरूक नागरिकांना’ आवाहन करण्यात येत होतं, की मतदारयादीत आपलं नाव असलं, तरी सोबत छायाचित्र आहे की नाही याची पडताळणी करणं देखील अत्यावश्यक आहे. यास्तव निवडणूक आयोगातर्फे कालच्या रविवारी देशभर एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ’जागरूक नागरिकांनी’ इतकंच करायचं होतं, की आपापल्या मतदानकेंद्रांवर जाऊन या नाव-छायाचित्र जोडीची पडताळणी करायची होती. जर कुणाचं नाव मतदारयादीत अजून समाविष्ट झालेलंच नसेल, तरी तिथल्या तिथे फॉर्म भरून ते करण्याची ’अमूल्य संधीही’ देऊ करण्यात आलेली होती. आमच्या घरातला एक जागरूक नागरिक... गेल्या वर्षी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला... आपल्याला यंदा मतदान करायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही असणारा. त्याच उत्साहात सहा-एक महिन्यांपूर्वी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेला. त्यावर नंतर काहीच घडलं नाही, मतदार-ओळखपत्र आलं नाही, मतदारयादीत नावही आलं नाही म्हणून जरा नाराज झालेला...त्याच्या आणि आमच्या आशा या आवाहनाने पुन्हा पल्लवित झाल्या. आपण ’जाग…

गर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास

(2013À`m "_wem{\$ar' {XdmirA§H$mV àH$m{eV Pmbobm boI.)
--------------------------
doi, gH$miMo 08:35. aoëdoñQ>oeZdaÀ`m {V{H$Q>-AmajU {IS>H$sg_moa bm§~bMH$ am§J bmdyZ C^r Agbobr _mUg§. ~hþVoH$m§À`m hmVmV AmajUmMo \$m°åg©². _r am§JoV gdm©V eodQ>Mr. _mÂ`mH$S>o \$m°_© Zmhr. {IS>H$s CKS>Vo. n{hbo XmoK§-{VK§OU OJ qOH$ë`mÀ`m WmQ>mV gagmdyZ C^o amhVmV. _mÂ`m_mJo AOyZ Hw$Urhr Ambob§ Zmhr. _bm àíZ nS>Vmo - \$m°_© ¿`m`bm {IS>H$ser Omd§, Va Amnë`m OmJoda Hw$UrVar `oD$Z C^§ amhUma. _J H$m` H$am`M§? H$mhrhr H$am`M§ Zmhr. em§VnUo H$mhr$ {_{ZQ>§ OmD$ Úm`Mr. H$moU Zm H$moU `oV§M. _J Ë`mbm "_oam Z§~a h¡ BXa...' Ag§ gm§JyZ {IS>H$snmer Om`M§. _r VoM H$aVo. _mJyZ Hw$UrVar AmoaS>V§§, "_°S>_, b¡Z_| Amd'. _r {IS>H$sV S>moH$mdyZ \$m°_© _mJVo. AmVbm _mUyg {VWë`mM EH$m JR²>R>çmVbm ~M>H$^a EodO _mÂ`m hmVmV H$m|~Vmo. _r naVVo. AmVm \$m°_© ^aÊ`mM§ H$m_. "Q´>oZ-Z§~a' `m aH$mÝ`mnmer Zoh_rà_mUo _mPr JmS>r AS>Vo. nwÝhm _m…