Posts

Showing posts from September, 2023

पुस्तक परिचय : काळे करडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)

Image
गेल्या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक . डिग्री कॉलेज शिक्षणाच्या वयोगटातल्या मुंबईतल्या मराठी मुला - मुलींच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी आहे . त्यांची आपसांतली मैत्री जुळणे , टिकणे , मोडणे . एकमेकांशी शेअरिंग . प्रेमप्रकरणं , सेक्सचा अनुभव . हे सगळं तर आहेच . त्यापलिकडेही व्यक्ती म्हणून त्यांची अन्डर कन्स्ट्रक्शन असणारी जडणघडण , त्यांच्यातली ऊर्जा , हे सगळंही आहे . मुद्दाम सांगण्याचा आव न आणता कथानकात या गोष्टी सहज येत जातात . वातावरणनिर्मिती छान आहे . पुस्तकाची भाषा , पात्रांच्या तोंडचे संवादही अगदी सहज , सोपे आहेत . द यंग अ‍ॅण्ड द रेस्टलेस अशी एक प्रचिती येते . कथानकाचा नायक फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतो . म्हणजे वर्तमानकाळात तो चाळीशीला पोचलेला वगैरे नाही . कॉलेजविश्वातून बाहेर पडून त्याला काहीच वर्षं झाली आहेत . ही सिच्युएशन मला आवडली , त्यामुळे जे घडून गेलं त्याबद्दल सांगताना वेगळा दृष्टीकोन बघायला मिळाला . ( या टाइपच्या पुस्तकांच्या नरेशनच्या दृष्टीने ) कॉलेजजीवनाचा अ