पुस्तक परिचय : काळे करडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)

गेल्या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक.

डिग्री कॉलेज शिक्षणाच्या वयोगटातल्या मुंबईतल्या मराठी मुला-मुलींच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी आहे.
त्यांची आपसांतली मैत्री जुळणे, टिकणे, मोडणे. एकमेकांशी शेअरिंग. प्रेमप्रकरणं, सेक्सचा अनुभव. हे सगळं तर आहेच. त्यापलिकडेही व्यक्ती म्हणून त्यांची अन्डर कन्स्ट्रक्शन असणारी जडणघडण, त्यांच्यातली ऊर्जा, हे सगळंही आहे.

मुद्दाम सांगण्याचा आव आणता कथानकात या गोष्टी सहज येत जातात. वातावरणनिर्मिती छान आहे. पुस्तकाची भाषा, पात्रांच्या तोंडचे संवादही अगदी सहज, सोपे आहेत.
यंग अ‍ॅण्ड रेस्टलेस अशी एक प्रचिती येते.
कथानकाचा नायक फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतो. म्हणजे वर्तमानकाळात तो चाळीशीला पोचलेला वगैरे नाही. कॉलेजविश्वातून बाहेर पडून त्याला काहीच वर्षं झाली आहेत. ही सिच्युएशन मला आवडली, त्यामुळे जे घडून गेलं त्याबद्दल सांगताना वेगळा दृष्टीकोन बघायला मिळाला. (या टाइपच्या पुस्तकांच्या नरेशनच्या दृष्टीने)
कॉलेजजीवनाचा अनुभव घेतलेल्या प्रत्येकाला यातली कोणती ना कोणती गोष्ट रिलेट होतेच.
काही प्रसंग, दृश्य, संवाद लांबलेले वाटले. पण एकूण वाचायला मजा आली.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : Shuggie Bain, लेखक : Douglas Stuart)