पुस्तक परिचय - White Rose, Black Forest (Eoin Dempsey)
महायुद्धावर आधारित फिक्शन अधूनमधून वाचायला मला आवडतं. तसंच हे आवडीखातर वाचण्याचं पुस्तक आहे.
आयुष्यात
सर्व काही गमावून बसलेली तरुण नायिका सुनसान ब्लॅक फॉरेस्टमध्ये आत्महत्या करायला निघाली
आहे. गडद थंडी, सगळीकडे बर्फ, अशात कुठेतरी जाऊन स्वतःवर गोळी झाडून घ्यायची असा तिचा
विचार आहे. दिशाहीन चालत निघालेली असताना तिला एके ठिकाणी एक सैनिक अर्धमेला होऊन पडलेला
दिसतो. त्याच्या पाठीवर पॅराशूट असतं. एक सॅक, त्यात काही सामान. गणवेशावर जर्मन स्वस्तिक
आणि नाव.
ती व्यवसायाने नर्स असते. नाझींमुळेच तिचे सगळे कुटुंबीय मारले गेलेले असतात. तरी त्या
सैनिकाला मदत न करता तसंच निघून जायचं हे तिला पटत नाही. ती त्याचा जीव वाचवण्याचा
प्रयत्न करायचं ठरवते.
तिची ती खटपट, तो सैनिक कोण असतो, गेस्टापोंना संशय येणं, पाठलाग, त्यांच्यापासून सुटका
करून घेण्याची पुढची धडपड, अधेमध्ये तिचे फ्लॅशबॅक्स – अशी ही कादंबरी आहे.
‘व्हाइट
रोझ’ या चळवळीबद्दल याआधी कधी वाचण्यात आलं नव्हतं. ते या पुस्तकामुळे समजलं. त्या
चळवळीतली दोन प्रमुख नावं - हान्स आणि सोफी - फ्लॅशबॅकमधली पात्रं म्हणून येतात.
युद्धपरिस्थिती, थंडीचे बर्फाळ दिवस, वुड केबिनमध्ये ते लपूनछपून राहत असतात तेव्हाची
परिस्थिती, त्यातलं डिटेलिंग हे सगळं एन्गेजिंग आहे.
त्या सैनिकाचं मिशन, पुढे त्यात या नर्सचा छोटासा पण महत्वाचा सहभाग, हे जरा फिल्मी
वाटलं, पण वॉर-फिक्शनच्या प्रेमापोटी चालवून घेतलं.
Comments