Posts

Showing posts from December, 2009

एक विकट हास्य... कुंच्याचं !!

एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्‌मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्‍याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं! नवर्‍यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्‍यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स्‌ धपाधप काढते. कधीकधी त्या फाईल्स्‌वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत का

खा, प्या, मजा करा, पण आधी हात धुवा !!

कीर्ती मागच्या आठवडय़ात कोल्हापूरला आमच्या घरातलं एक लग्न होतं. मला शाळा आणि क्लास बुडवणं शक्य नव्हतं. म्हणून आई-बाबा दोघंच जाऊन आले. शुक्रवारचा अर्धा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा आख्खा दिवस मी एकटी होते. मी प्रथमच एकटी राहणार होते, त्यामुळे आई जाताना शंभर सूचना करून गेली. त्यातल्या नव्व्याण्णव सूचना मी ऐकून सोडून दिल्या. एक मात्र लक्षात ठेवली आणि सांगितलेल्या वेळी बरोबर अमलातही आणली. ती म्हणजे शुक्रवारच्या रात्री घरी कुठल्या तरी मैत्रिणीला सोबतीला बोलावण्याची. ही सूचना एकदम ब्येष्ट होती. त्याच्या बदल्यात आईच्या इतर नव्व्याण्णव सूचनाच कशाला, एकशे नव्व्याण्णव आज्ञा पाळायलाही मी तयार होते. फक्त ‘मैत्रिणीला’च्या जागी मी ‘मैत्रिणींना’ इतकाच बदल केला. सुजी, दोन्ही अस्मिता आणि प्रज्ञा चौघी क्लासमधून थेट माझ्या घरीच आल्या. आल्या आल्या आधी आम्ही सगळ्यांनी मिळून टीव्हीवर ‘हॅना मॉंटाना’ बघितलं. इतर वेळी आम्ही आपापल्या घरात एकेकटय़ाच ती सीरियल पाहतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून बघायला सही वाटलं. मायली सिरस त्यात कस्सली दिसते, कस्सली धमाल काम करते. रॉक स्टार म्हणून अगदी शोभून दिसते. आमच्य