Posts

Showing posts with the label अनुभव मासिक

तीन बेटांची कहाणी (रेफ्युजी मालिकेतला पुढचा लेख)

Image
  You have to understand, That no one puts their children in a boat Unless the water is safer than the land... - वारसन शायर, ब्रिटिश कवयित्री १. ऑक्टोबर २०१३, एका संध्याकाळी उशीरा उत्तर आफ्रिकेतल्या लिबियाच्या किनार्‍यावरून एक बोट निघाली. बोटीत सिरियातले जवळपास ५०० निर्वासित होते. बोट भूमध्यसमुद्रातून निघाली. पुढे सर्वात जवळचा देश म्हणजे इटली. ती रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस बोट पाणी कापत चालली होती. त्या वाटेवर इटलीच्या मुख्य भूमीच्या बरंच आधी लाम्पेदूसा हे इटलीच्याच अखत्यारीतलं बेट येतं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या बेटाच्या थोडं अलिकडे असताना बोट उलटली. लाम्पेदूसा बेटाच्या पूर्वेकडे माल्टा हा लहानसा देश आहे. इटली आणि माल्टाच्या जहाजांनी काही निर्वासितांना वाचवलं; पण त्यादिवशी जवळपास २७० जणांना (त्यांत ५०-६० लहान मुलंही होती) आपले प्राण गमवावे लागले. जीवाच्या भीतीने सगळे निघालेले; त्यांना आशा होती, की एकदा लाम्पेदूसाला पोहोचलो की झालं; मग आपण दुसर्‍या जगात असू; तिथे सगळं आलबेल असतं असं म्हणतात. मधला हा एक समुद्र तेवढा पार करायचा. त्याच्यावरच ...

अफगाण निर्वासित - फुफाट्यातून कुठे?

Image
अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरालगत गेल्या काही वर्षांत एक नवी वस्ती उभी राहिली आहे. वस्ती कसली , एक लहानसं खेडंच म्हणायला हवं. खेड्यात एका जेमतेम गिलावा केलेल्या छोट्या घरात ६० वर्षीय हलिमा बीबी आपल्या तीन तरूण मुलांसह राहते. त्यांतल्या एकालाही नोकरी नाही. हलिमा बीबीची प्रकृती वयोमानापरत्वे खालीवर होत असते. पण गावात कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. गावात अशी आणखी पाचशे-सहाशे कुटुंबं सहज असतील. त्यांची संख्या सतत वाढते आहे. गावाच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. चिंतेने ग्रासलेली हलिमा बीबी म्हणते , ‘ इथे अवघड परिस्थिती आहे. आमचे नातेवाइक , मित्रमंडळी सगळे तिकडेच आहेत. इथे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे.’ हलिमा बीबी सांगते ते ‘तिकडे’ म्हणजे पाकिस्तानात. या गावातले सर्वजण पाकिस्तानात तीन-चार दशकं निर्वासित म्हणून घालवून आता अफगाणिस्तानात परतले आहेत. तेव्हा स्वतःचं घरदार सोडून पळताना त्यांच्यासमोर भविष्यातला अंधार होता आणि आता परतल्यावर देखील भविष्यात काय वाढून ठेवलंय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही... अफगाणिस्तानातलं नागरी जीवन सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासून ढवळून निघायला सुरुवात ...

निर्वासितांच्या कला, निर्वासितांसाठी कला

Image
  "and yet I found in this dome a lot of love, kindness, spirit, life, moments - and pure art... I felt: yes, I am a citizen of the world and I have a safe place." -- माजिद आदिन, इलस्ट्रेटर, इराण ----- सुप्रसिद्ध इंग्लिश पॉप-रॉक गायक सर एल्टन जॉन यांचं सत्तरच्या दशकातलं एक गाणं आहे- ‘रॉकेट मॅन’. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून दोन-तीन वर्षंच झाली होती... अवकाशमोहिमांचं अद्भुत जगासमोर आलं होतं... अशात या गाण्याचे गीतकार बर्नी टॉपिन यांनी एका अंतराळवीराची व्यथाच या गाण्यात उलगडून दाखवली. अंतराळ मोहिमा म्हणजे फार काळ आश्चर्याची बाब राहणार नाही, बघताबघता माणसांसाठी ती नित्यनेमाची गोष्ट होईल, असं म्हणत त्यांनी तंत्रज्ञान आणि मानवी मन यांच्यातलं द्वंद्व गाण्यात मांडलं. पाश्चात्य जगतात हे गाणं खूप गाजलं. सर एल्टन आणि टॉपिन यांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं. या संगीतमैत्रीला ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २०१७ साली एक स्पर्धा घेण्यात आली. या जोडीची सत्तरच्या दशकातली तीन गाणी निवडून तीन वेगवेगळ्या प्रकारांतर्गत त्याचे म्युझिक व्हिडिओज तयार करून पाठवण्याचं आवाहन केलं गेलं. त्यात ‘र...

निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल

Image
 ‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’... सिरियातून पळावं लागलेल्या अलाचा तुर्की भाषेशी झालेला हा पहिला सामना. आज चार-पाच वर्षं उलटून गेली. अला तीच तुर्की भाषा आता व्यवस्थित बोलतो. इस्तंबूलमध्ये, म्हणजे तुर्की राजधानीतच राहतो. तिथे एका एन.जी.ओ.मार्फत तिथल्या सिरियन निर्वासित मुलांना कॉम्प्युटर शिकवतो. अरेबिक भाषेचे ऑनलाइन कोर्सही घेतो. तो कोणत्या परिस्थितीत मायदेशातून बाहेर पडला, त्यापूर्वी तो आणि त्याच्यासारख्या इतर अनेकांवर तिथे काय काय परिस्थिती ओढवली, हे तो विसरलेला नाही. मात्र भूतकाळाला कवटाळून न बसता तो आता पुढे निघाला आहे. आपली सिरियन मुळं न विसरता तो तुर्की जीवनाला, तुर्की समाजाला आपलंसं करण्याच्या प्रयत्नात आहे. काही अंशी यशस्वीही झाला आहे. निर्वासितांच्या पुनर्वसनात भाषाशिक्षण किती महत्वाचं असतं हे अलाच्या उदाहरणावरून अधोरेखित होतं. नि...

मोडलेली मनं, जोडणारे खेळ

Image
  ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’... सिरियाचे दोन जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे दोन ज्युडोपटू, इथियोपियाचा एक मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे पाच धावपटू... त्या दहाजणांचे स्वतःचे देश आता त्यांचे उरले नव्हते. त्यांचं निर्वासित असणं त्यांना इतरांहून वेगळं करणारं होतं. मात्र ते बोचरं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. ऑलिंपिक्स खेळांनी त्यांना तशी संधी दिली होती. एक नवा इतिहास घडत होता. त्याला कारणीभूत होती जगाची बसलेली एक नवी घडी... की विस्कटलेली? खेळ, शारिरीक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना करणं आपल्याला...

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

Image
  “Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.” – UNHCR, Policy on Refugee Children   "... तुर्कस्थानातून ग्रीसच्या किनार्‍यावर होड्या भरून आलेले निर्वासित... मोठी माणसं , लहान मुलं... सगळे असे कोर्‍या चेहर्‍याने इथे तिथे बसलेले... मला कळेना , यांच्यासमोर मी काय सादर करणार... तरी मी खिशातून नेहमीचे गंमतीदार मोठे दात काढले , ते माझ्या दातांवर बसवले आणि भुवया उडवून जरासा हसलो ; तर एका लहानगीचा चेहरा लगेच खुलला , तिने शेजारच्या मुलाला कोपराने जरासं ढोसून खुणेने सांगितलं , तो बघ , कोण आहे!” हे सांगणारा क्ले मेझिंग एक विदूषक आहे. आधुनिक जगात सर्कसच्या बाहेर विदूषक बघायला मिळणं तसं दुर्मिळच. आज मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे , पैसा नको आहे ; निर्वासित मुलांच्या चेहर्‍यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय...