Posts

Showing posts from March, 2014

जागरूक नागरिक ऊर्फ मोरू

Image
जागरूक नागरिक असणं म्हणजे स्वतःचा मोरू करून घेणं... गेला आठवडाभर सर्व वर्तमानपत्रांमधून ’जागरूक नागरिकांना’ आवाहन करण्यात येत होतं, की मतदारयादीत आपलं नाव असलं, तरी सोबत छायाचित्र आहे की नाही याची पडताळणी करणं देखील अत्यावश्यक आहे. यास्तव निवडणूक आयोगातर्फे कालच्या रविवारी देशभर एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ’जागरूक नागरिकांनी’ इतकंच करायचं होतं, की आपापल्या मतदानकेंद्रांवर जाऊन या नाव-छायाचित्र जोडीची पडताळणी करायची होती. जर कुणाचं नाव मतदारयादीत अजून समाविष्ट झालेलंच नसेल, तरी तिथल्या तिथे फॉर्म भरून ते करण्याची ’अमूल्य संधीही’ देऊ करण्यात आलेली होती. आमच्या घरातला एक जागरूक नागरिक... गेल्या वर्षी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला... आपल्याला यंदा मतदान करायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही असणारा. त्याच उत्साहात सहा-एक महिन्यांपूर्वी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेला. त्यावर नंतर काहीच घडलं नाही, मतदार-ओळखपत्र आलं नाही, मतदारयादीत नावही आलं नाही म्हणून जरा नाराज झालेला...त्याच्या आणि आमच्या आशा या आवाहनाने पुन्हा पल्लवित झाल्या. आपण ’जाग…