Posts

Showing posts from December, 2008

दोन अनुत्तरित, गहन प्रश्न.

रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "...
भरधाव वेगाने निघालेल्या गाडीसमोर अचानक एखादी म्हैस वगैरे यावी तशी मी गप्पकन थांबले. एखाद्या नवशिक्या गोलंदाजानं ऐन भरातल्या फलंदाजाला अनपेक्षितरित्या चकवून बाद करावं तसं माझ्या मुलानं हा प्रश्न विचारून मला ’क्लीन बोल्ड’ केलं. क्षणभर मी करत असलेलं काम विसरले. चिमणी का असते? म्हणजे?? मला वाटलं आपण ऐकण्यात काहीतरी चूक केली असेल. म्हणून त्याला परत विचारलं. तर मगाचच्या त्या फलंदाजाच्या विकेटचा ’ऍक्शन रीप्ले’ पाहावा लागला... "चिमणी का असते? &…

हा प्रत्यय’च’ हे करू शकतो!

वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे. ’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते. वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांना हा ’च’चा प्रत्यय लावला की त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलतो.
उदाहरणादाखल एखादं अगदी साधं वाक्य घेऊ - ’मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. ’ हे ते वाक्य.आता यातल्या एकेका शब्दाला पुढे ’च’ लावला की अर्थ कसा बदलतो ते पाहा.

* मुलंच प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात.
(म्हणजे, बाकी कुणी प्रश्न विचारले तरी चालतात. पण मुलं मात्र भंडावून सोडतात. )

* मुलं प्रश्नच विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात.
(म्हणजे, मुलांनी बाकी काही केलं तरी चालतं. पण प्रश्न विचारले की मोठे वैतागतात. )

* मुलं प्रश्न विचारूनच मोठ्यांना भंडावून सोडतात.
(म्हणजे, मोठ्यांना भंडावून सोडण्यासाठी म…

पुठ्ठा, सेलोटेप आणि ’पॅकर्स अँड मूव्हर्स’

नुकताच, नवऱ्याच्या नोकरीबदलामुळे, गेली अकरा वर्षं वास्तव्य असलेलं गाव सोडून नवीन गावी स्थलांतराचा योग आला. स्थलांतर आपल्या सोबत शंभर गोष्टी घेऊन येतं. त्यांत प्रथम स्थानावर विराजमान अर्थातच सामानाची बांधाबांध. सामानाची बांधाबांध आपल्या सोबत अजून डझनभर गोष्टी घेऊन येतं आणि त्यातली सर्वात अपरिहार्य कुठली असेल तर ती नवरा-बायकोची वादावादी! कुठल्या वस्तू फेकायच्या, कुठल्या ठेवायच्या, "कशाला इतका पसारा जमवून ठेवलाय", "वेळच्यावेळी आवरायला काय होतं", "मला काय तेवढं एकच काम असतं का घरात"... या प्रत्येक शीर्षकाखाली तात्विक मतभेदांवर(! ) आधारित अजून ढीगभर संवाद! पण यावेळी त्या डझनाच्या पटीतल्या सर्व गोष्टींना फाटा मिळणार होता कारण सामानाच्या बांधाबांधीला आम्ही प्रथमच ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ना बोलवायचं ठरवलं होतं. (इथे सर्वात आधी हे स्पष्ट केलं पाहिजे की या संज्ञेचं मराठीकरण शक्य नाही. ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ च्या जागी ’सामानाची बांधाबांध करणारे आणि सामान हलवणारे’ असं त्याचं भाषांतर केलं तर सगळी मजाच जाईल. शिवाय शीर्षकावरून लेख कशाबद्दलचा आहे ते ब्रह्मदेवाच्या बापालाही क…

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका : २

( पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत। प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

अ - इचलकरंजीत असताना असे अनेक आलाप आमच्यासारख्यांनी अहमहमिकेने ऐकले आणि एकूणच इतर आलाप आवर्जून ऐकता-ऐकता आम्हाला आलापांच्या आयोजकांचे अशक्य इंगित उमगले।

क - कॅल्शियमची कमतरता कमी करण्यासाठी कृश कुसुमने कोल्हापुरात कुलकर्ण्यांकडे किती काबाडकष्ट काढले !

ख - खेडजवळच्या खेड्यात खुरप्याने खालचं खोरं खुरपून खमक्या खापरपणजीने खानदानासाठी खूप खस्ता खाल्ल्या।

ग - गुटगुटीत, गोऱ्या गोलूने गोड गाणे गायल्याने गोंधळलेल्या गोविंदाने गावातून गपगुमान गाशा गुंडाळला।

घ - घाणेरडं घासलेट घेऊन घाईघाईने घरंदाज घारपुऱ्यांच्या घरात घुसणाऱ्या घोसावळेकरांवर घैसासांची घसघशीत घार घिरट्या घालेलच !!

च - चुकार चंदूने चौथ्यांदा चरखा चालवता चालवता चेरी, चारोळीयुक्त चमचम चोरून चुटकीसरशी चाखली।

छ - छटाकभर छुंद्यासाठी छत्तीसगढच्या छत्र्यांनी छोटासा छत्रीचा छाप छतावर छत्तीसवेळा छानपैकी
छापला।

ज - जर्मनीचा जाणकार ज्योतिबा जळगावच्या जोश्यांच्या जुन्या जन…

सावधान! चालक (अजूनही) शिकत आहे...

(वैधानिक इशारा(?) : क्लास लावून कार चालवायला शिकताय? किंवा शिकायचा विचार करताय? तर हा लेख आपापल्या जबाबदारीवर वाचा। याआधीच क्लासला जाऊन कार चालवायला शिकला आहात? मग हा लेख बिनधास्त वाचा. तुम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याची जबाबदारी माझी.)

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक यंत्रं, उपकरणं वापरत असतो। काही काळ ती उपकरणं हाताळली की त्यांच्या सर्व बारकाव्यांनिशी आपण ती वापरण्यात तरबेज होतो। त्यासाठी कुणाची शिकवणी लावायची गरज पडत नाही. पण कार चालवण्याचं मात्र तसं नाही. (अर्थात, स्वतःस्वतःच, कुणाच्याही मदतीशिवाय कार चालवायला शिकणारेही असतील. त्यांना या लेखाच्या खोलात शिरण्यापूर्वीच माझा दंडवत. पण कुणाच्याही मदतीशिवाय शिकण्यासाठी कार अश्या लोकांच्या ताब्यात देणे हीच त्यांना खरं म्हणजे सर्वात मोठी मदत असते. त्यामुळे त्या दंडवताचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे असं नाही का वाटत तुम्हाला?)
तर - गरज म्हणून, आवड म्हणून, घरात नवीन कार आली आहे म्हणून किंवा उगीच - ’कार चालवायला शिकलं पाहिजे’ असं वाटायला लागतं। आता ’शिकलं पाहिजे’ म्हणजे कुणीतरी शिकवलं पाहिजे. घरातल्या कुणाकडून ही गोष्ट शिकायची तर त्यात शि…

बरं झालं...

बरं झालं - अतिरेक्यांची गोळी करकरेंचं बुलेट-प्रूफ जॅकेट भेदून गेली. आता निदान पोलिसांना निविदा, कंत्राटं इ. च्या कचाट्यात न अडकलेली बुलेट-प्रूफ जॅकेटस मिळतील.

बरं झालं - करकरेंच्या पत्नीनं मोदींची आर्थिक मदत नाकारली. निदान आता तरी निगरगट्ट मोदींना शहाणपण येईल.

बरं झालं - गिरगाव चौपाटीवर अतिरेक्यांवर तीन(च) फैऱ्या झाडल्यावर पोलिसांच्या बंदुका नादुरुस्त झाल्या. निदान पोलिसदलाकडे दुर्लक्ष झाल्याचं मुर्दाड राजकारण्यांच्या लक्षात तरी आलं. (की त्यांनी मिडियासमोर नुसतं तसं दाखवलं? कारण आजपर्यंत त्यांनी दुसरं केलंय तरी काय? )

बरं झालं - राम गोपाल वर्मा आणि रितेश देशमुख पण ताज हॉटेलमध्ये ’मजा’ बघायला गेले. निदान त्यामुळे तरी निर्लज्ज मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची सोडली.

बरं झालं - ताजमध्ये दगावलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ स्त्री-पत्रकाराचा त्या दिवशी हरवलेला मोबाईल रायगड जिल्ह्यात कुठेतरी सापडला. निदान त्यामुळे दहापेक्षा जास्त अतिरेकी मुंबईत घुसले होते हे सामान्य जनतेला कळलं.

बरं झालं - हेलिकॉप्टर मधून दोरखंडाच्या सहाय्याने सरसर उतरणारे कमांडो अवघ्या देशाने पाहिले. निदान तसंच प्रशिक्षण पो…